Pakistan Fined : आयसीसी वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडविरुद्ध स्लो ओव्हर रेटसाठी पाकिस्तानला मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार, निर्धारित वेळेत एक षटक कमी केल्यास खेळाडूंना मॅच फीच्या पाच टक्के दंड आकारला जातो. बाबरने आपला गुन्हा मान्य केला असून त्यामुळे या प्रकरणात औपचारिक सुनावणीची गरज नव्हती.
न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर 402 धावांचे लक्ष्य ठेवले तेव्हा बाबर आझम अँड कंपनी हा सामना जिंकेल असे कोणालाही वाटले नव्हते, पण पावसामुळे पाकिस्तान संघाने डकवर्थ आणि लुईस नियमाच्या जोरावर किवी संघाचा 21 धावांनी पराभव केला.
वर्ल्ड कपच्या 48 वर्षांच्या इतिहासात प्रथमच 400 धावा करून संघ पराभूत झाला आहे. किवी संघाच्या रचिन रवींद्रने 108 धावांची उत्कृष्ट खेळी केली.
प्रत्युत्तरात पावसामुळे सामना दोनदा थांबवण्यात आला. खेळ थांबला तोपर्यंत पाकिस्तानने 25.3 षटकात एका विकेटवर 200 धावा केल्या होत्या. त्यावेळी डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तान संघ 21 धावांनी पुढे होता, त्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. पाकिस्तानच्या विजयाचा खरा हिरो फखर जमान होता. त्याने 81 चेंडूत 126 धावांची शानदार खेळी केली.
आता पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर या विजयासह पाकिस्तानचे आठ सामन्यांनंतर चार विजयांसह आठ गुण झाले आहेत. न्यूझीलंडचेही तेवढ्याच सामन्यांनंतर चार विजयांसह आठ गुण आहेत. मात्र, नेट रनरेटच्या आधारे किवी चौथ्या स्थानावर तर बाबरचा संघ पाचव्या स्थानावर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.