लाहोर : भारताचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) कोरोनाची लागण झाल्यानंतर इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, संघाचा उपकर्णधार केएल राहुल देखील दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्याला आधीच मुकला आहे. अशा परिस्थितीत जर रोहित कसोटी सामना खेळू शकला नाही तर भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. दरम्यान, जर रोहित शर्मा सामन्यापर्यंत फिट झाला नाहीच तर भारतीय संघाचे नेतृत्व ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. (Pakistan Former Cricketer Danish Kaneria Statement About Rishabh Pant Captain In England Test)
दरम्यान, पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने याबाबत आपले मत व्यक्त केले. त्याचा ऋषभ पंतला कर्णधार करण्यासाठी विरोध आहे. दानिश कनेरिया आपल्या युट्यूब चॅनेलवर म्हणतो की, 'ज्यावेळी आपण कर्णधारपदाबाबत बोलतो त्यावेळी तीन चार नावं पुढं येतात. विराट कोहलीचे नाव त्यात येत नाही. मला आश्चर्य वाटते की विराट कोहलीचे (Virat Kohli) नाव कोणीच सुचवत नाही. ऋषभ पंतचे नाव असते, जसप्रीत बुमराहचे (Jasprit Bumrah) नाव असते. जर रोहित खेळू शकला नाही तर ते बर्मिंगहॅम कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व करतील.'
कनेरिया पुढे म्हणाला की, 'भारतीय कसोटी संघात चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हा एक अनुभवी खेळाडू आहे. तो देखील नेतृत्व करू शकतो. याचबरोबर भारताकडे सर्वात उत्तम पर्याय म्हणजे विराट कोहली. त्याला तुम्ही कर्णधार करू शकता. रविचंद्रन अश्विन हे देखील संघातील एक वरिष्ट नाव आहेच.'
पंतच्या नेतृत्वाबाबत दानिश कनेरिया म्हणतो की, 'ऋषभ पंतला तुम्ही दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत कर्णधार करून पाहिले. त्याने धक्कादायक निर्णय घेतले. ज्यावेळी तो कर्णधार असतो त्यावेळी त्याची बॅटिंग ढेपाळते. ऋषभ पंतला आता पुन्हा कर्णधार करू नये. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हा देखील कर्णधारपदासाठी चांगला पर्याय आहे. माझ्या मते बुमराहवर हा ताण देऊ नये. तो त्याच्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करू देत. हे कसोटी क्रिकेट आहे. मी बुमराह आणि पंतकडे कर्णधार म्हणून पाहत नाही.'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.