Pakistan Hockey Crisis : पाकिस्तान हॉकी फेडरशेनच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ काही केल्या कमी होत नाहीये. पैशाची चणचण भासणाऱ्या हॉकी संघटनेने त्यांच्या कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यापासून पगारच दिलेला नाही. पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे लाहोर येथील सर्व कर्मचारी आणि कराची येथील कार्यालयातील कर्मचारी यांना सहा महिन्यापासून पगार मिळालेला नाही.
जवळपास कार्यालयातील आणि ग्राऊंड स्टाफ असे मिळून 80 कर्मचारी आपल्या पगाराच्या प्रतिक्षेत आहेत. या कर्मचाऱ्यांना त्यांचे मेडिकल बेनिफिट देखील मिळालेले नाही. आता तर परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे. देशाच्या वरिष्ठ खेळाडूंना देखील गेल्या चार - पाच महिन्यांपासून त्यांच्या कराराची रक्कम आणि भत्ता मिळालेला नाही. त्यांना ओमानमध्ये झालेल्या ऑलिम्पिक पात्रता फेरीत खेळल्यानंतरही पैसे मिळाले नाहीत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान हॉकी संघाचा कर्मधार इमाद शकील बट्ट आणि काही वरिष्ठ खेळाडूंचा ऑलिम्पिक पात्रता फेरीतील सामन्यावेळी संघ व्यवस्थापनाशी वाद देखील झाला आहे. त्यावेळी खेळाडूंना दिवसाचा भत्ता देखील मिळाला नव्हता.
सूत्रांनी माहिती दिली की, 'कर्णधार बट्टने जर दिवसाचा भत्ता मिळाला नाही तर पुढचे सामने न खेळण्याची धमकी देखील दिली होती.'
पाकिस्तान हॉकीच्या झालेल्या या अवस्थेला कोण जबाबदार आहे हे कोणालाच माहिती नाही. हॉकी संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिगेडियर खालीद सज्जाद खोकर यांनी या सर्व गोष्टींना माजी अध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्षांना यासाठी जबाबदार धरलं. सरकारने पाकिस्तान हॉकी फेडरेशनला फक्त पैसे देण्यास नकार दिलेला नाही तर त्यांचे खाते देखील निलंबित केलं आहे. संघटनेतील पदाधिकाऱ्यांची सध्या पैशचा गैरवैवहार केल्याच्या आरोपाखील चौकशी सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.