pakistan may pull out of asia cup after sri lanka afghanistan bangladesh reject hybrid model report sakal
क्रीडा

Asia Cup : आशिया कपवरून पाकिस्तान क्रिकेट मंडळाची कोंडी

सकाळ वृत्तसेवा

कराची : अर्धे सामने आमच्या देशात तर भारताचे सामने दुसऱ्या देशात (हायब्रीड) असा पाक मंडळाने दिलेला प्रस्ताव श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांच्या मंडळांनीही फेटाळल्यामुळे आशिया कप क्रिकेट स्पर्धेतून माघार घेण्याशिवाय यजमान पाककडे पर्याय राहिलेला नाही, असे चित्र निर्माण झाले आहे.

सप्टेंबर महिन्यात नियोजित असलेल्या या स्पर्धेचे मूळ यजमान पाक आहे, परंतु पाकिस्तानमध्ये आम्ही खेळणार नाही, याचा ठाम पुनरुच्चार बीसीसीआयने केल्यानंतर पाक मंडळ पर्याय शोधू लागले होते. त्यातून हायब्रीड मॉडेल त्यांनी सुचवले. त्यानुसार पाकचे साखळी सामने त्यांच्या देशात होतील तर भारताचे सामने इतर देशांत खेळवले जाणार होते. बीसीसीआयने हा प्रस्तावही कधीच फेटाळला होता. आता श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांनीही तीच भूमिका घेतली आहे, त्यामुळे पाकसमोर अडचणी वाढल्या आहेत.

आशिया क्रिकेट परिषदेची या महिन्यात बैठक होऊन त्यात पाकचा प्रस्ताव नाकारण्याची औपचारिकता राहिली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा हे आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत.

पुढची शक्यता ओखळून पाक क्रिकेट मंडळाचे कार्याध्यक्ष नजम सेठी यानी हालचाली सुरू केल्या आहेत. पाक क्रिकेट समितीच्या सदस्यांसह सरकारी पातळीवरही चर्चा सुरू केली आहे. आपल्याकडून यजमानपद गेले तर दुसऱ्या कोणत्याही देशात होणाऱ्या स्पर्धेत आपण खेळायचे का याची विचारणा ते करत आहेत. इतर कोणत्याही देशात ही स्पर्धा झाली तर आम्ही बहिष्कार घालू, असे ते सध्या तरी म्हणत आहेत. ज्या देशात स्पर्धा होईल तेथे खेळायचे किंवा माघार घ्यायची असे दोनच पर्याय पाक मंडळाकडे आहेत.

पाकिस्तानने माघार घेतली आणि आशिया कप रद्द करण्याची वेळ आली, तर नुकसान पाकचे होणार आहे. भारत- श्रीलंका- अफगाणिस्तान आणि श्रीलंका अशी चौरंगी मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा या कालावधीत खेळवली जाऊ शकते आणि भारतात होणाऱ्या मर्यादित षटकांच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी ही सर्धा महत्त्वाची ठरू शकेल.

श्रीलंका मंडळ भारताच्या भूमिकेला पाठिंबा देत आहे हे लक्षात येताच पाक मंडळाने हा राग श्रीलंकेवर काढला आहे. पाकचा संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात एकदिवसीय मालिकाही खेळावी असा प्रस्ताव श्रीलंकेने दिला होता, पाकने हा प्रस्ताव नाकारला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT