World Cup 2023 Schedule Change : भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमधील सर्वात हाय व्होल्टेज सामना, भारत पाकिस्तान सामन्याची घोषित झालेली तारीख बदलण्याचे संकेत बीसीसीआयने दिले होते. यापूर्वी हा सामना घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबरला होणार होता. मात्र भारतातील सुरक्षा एजन्सींनी ही तारीख बदलण्याचा सल्ला दिला होता. तो सल्ला बीसीसीआयने मान्य केला आहे. (Pakistan ODI World Cup 2023 Schedule Change)
बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारत पाकिस्तान सामना हा आता 15 ऐवजी 14 ऑक्टोबरला होणार आहे. मात्र यामुळे पाकिस्तानचे जवळपास सगळे शेड्युल बदलावे लागले आहे. पाकिस्तान आता 6 ऑक्टोबरला हैदराबाद येथे नेदरलँड्सविरूद्ध सामना खेळेल.
त्यानंतर पाकिस्तान हैदराबादमध्येच 10 ऑक्टोबरला श्रीलंकेविरूद्ध खेळणार आहे. तर भारतातबरोबरचा 15 ऑक्टोबरचा सामना हा आता 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच खेळवला जाईल.
दरम्यान, पाकिस्तानने अजून भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये सहभागी होणार आहे की नाही याबाबतचा निर्णय कळवलेला नाही. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध पाहता पीसीबीला (PCB) भारतात संघ पाठवण्यापूर्वी पाकिस्तान सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे.
यापूर्वी पाकिस्तानचा संघ भारतात 2016 ला शेवटचा खेळला होता. आता या वर्षाच्या वर्ल्डकपमध्ये सहभागी व्हायचं की नाही याबाबत चा निर्णय गुरूवारी होण्याची शक्यता आहे.
रेव्ह स्पोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार याबाबतचा निर्णय घेण्यापूर्वी 14 सदस्यांची समिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी गुरूवारी चर्चा करणार आहे. भारताने आशिया कप 2023 साठी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता.
त्यानंतर पाकिस्तान देखील वर्ल्डकपवर बहिष्कार घालण्याची धमकी देत होता. मात्र पीसीबी चेअरमन झाका अश्रफ यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना वर्ल्डकपमध्ये संघ पाठवण्याची परवानगी द्यावी यासाठी गेल्या आठवड्यात पत्र लिहिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.