Pakistan Super League former Pakistani player Moin Khan son Azam Khan hit sixes to Shahid Afridi Esakal
क्रीडा

Video: मोईन खानच्या पोरानं आफ्रिदीला चांगलाच धुतला

अनिरुद्ध संकपाळ

पाकिस्तानात सध्या पाकिस्तान प्रीमियर लीग (Pakistan Super League) सुरू आहे. विशेष म्हणजे या लीगमध्ये पाकिस्तानचा चिरतरूण खेळाडू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) देखील खेळत आहे. मात्र कालच्या इस्लामाबाद युनायटेड आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यातील सामन्यात शाहिद आफ्रिदीची चांगलीच नाचक्की झाली. पाकिस्तानचा माजी खेळाडू मोईन खान (Moin Khan) याच्या मुलाने शाहिद आफ्रिदीची चांगलीच धुलाई केली.

मोईन खानचा मुलगा आझम खानने (Azam Khan) इस्लामाबाद युनायटेड कडून खेळताना कालच्या समन्यात 35 चेंडूत 65 धावांची आक्रमक खेळी केली. या खेळीच्या जोरावर इस्लामाबादने क्वेटा ग्लॅडिएटर्स समोर 230 धावाचे आव्हान ठेवले. मात्र हे आव्हान क्वेटा ग्लॅडियएटरला पेलवले नाही. त्यांचा संपूर्ण संघ 187 धावात बाद झाला.

मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या आझम खानने शाहिद आफ्रिदीच्या एकाच षटकात तीन षटकार मरात पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची चांगलीच धुलाई केली. इस्लामााबाद युनायटेडची धावसंख्या 180 पर्यंत पोहचेल असे वाटत होते. मात्र आझम खानने 35 चेंडूत 65 धावांची खेळी करत ही धावसंख्या 229 धावांपर्यंत पोहचवली. या खेळीत आझम खानने 6 षटकार आणि 1 चौकार मारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT