Ramiz Raja Statement About India Respect  esakal
क्रीडा

Ramiz Raja: 'टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळला नाही तर...', पीसीबीने भारताला दिली धमकी

पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांनी बीसीसीआयला दिला इशारा

Kiran Mahanavar

Pakistan Cricket Team : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी ऑक्टोबरमध्ये विधान केले होते. पुढील वर्षी आशिया चषकासाठी भारत पाकिस्तानला जाऊ शकणार नाही. ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवली जाऊ शकते. बीसीसीआयचे सचिव असण्यासोबतच जय शाह आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षही आहेत, अशा परिस्थितीत त्यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड संतप्त झाले. जवळपास महिना उलटला तरी पीसीबी प्रमुख रमीझ राजा यांनी या प्रकरणावर आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी बीसीसीआयला धमकीसह आव्हान दिले आहे.

आशिया चषक खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानात न गेल्यास पाकिस्तान भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर बहिष्कार टाकेल, असे पाकिस्तानकडून यापूर्वीही सांगण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीझ राजा यांनी या प्रकरणाला पुन्हा एकदा हवा दिली आहे. ते म्हणाले, "जर ते आशिया चषकासाठी पाकिस्तानात आले नाहीत तर ते आमच्याशिवाय पुढच्या वर्षी विश्वचषक खेळतील." याबाबत आम्ही आक्रमक भूमिका घेणार आहोत.

पुढे बोलताना रमीझ राजा म्हणाले की, 'पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषकात पाकिस्तानचा संघ खेळला नाही, तर बघूया कोण बघणार ही स्पर्धा. गेल्या वर्षी विश्वचषकात आम्ही भारताला हरवले होते. आशिया कपमध्येही आम्ही भारताचा पराभव केला. पाकिस्तानी संघाने बिलियन डॉलर इकॉनॉमी संघाचा दोनदा पराभव केला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीझ राजा म्हणाले, आमचा संघ चांगली कामगिरी करत आहे. आम्हाला पाकिस्तान क्रिकेटची अर्थव्यवस्था सुधारण्याची गरज आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आम्ही चांगले खेळू. टी-20 विश्वचषक 2022 च्या फायनलमध्ये पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याच वेळी, यापूर्वी आशिया कप 2022 च्या अंतिम फेरीत श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT