Pakistan Team in World cup 2023 : आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकप यावेळी भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, तर या प्रतिष्ठित स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला खेळवला जाईल. 29 सप्टेंबरपासून वर्ल्डकपचे सराव सामने खेळल्या जाणार आहेत. टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंडसह अनेक संघ या स्पर्धेत आहेत. त्याचबरोबर भारताला 2011 नंतर पुन्हा एकदा मायदेशात एकदिवसीय वर्ल्डकप जिंकण्याची संधी आहे.
मात्र, भारतात येणाऱ्या सर्व संघांचे व्हिसा मंजूर करण्यात आले आहेत. मात्र बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघाला अद्याप भारत सरकारकडून व्हिसा मंजूर झालेला नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाचा दुबईला जाऊन खेळाडूंसोबत शिबिर घेण्याची योजना रद्द करण्यात आली आहे. वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का आहे.
ईएसपीएननुसार, पाकिस्तान संघाची प्लानिंग असे होते की त्यांचे सर्व खेळाडू वर्ल्डकपपूर्व शिबिरासाठी दुबईला जातील. तेथून ते सर्वजण भारतातील हैदराबादला जातील. यासाठी बाबर अँड कंपनी यूएईला जाणार होते आणि तेथे काही दिवस घालवून नंतर भारतात येणार होते.
मात्र आता ही प्लानिंग उद्ध्वस्त झाली आहे. कारण आतापर्यंत पाकिस्तान संघाला भारतात येण्यासाठी व्हिसा देण्यात आलेला नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आठवड्याभरापूर्वी व्हिसासाठी अर्ज केला होता, मात्र तो अद्याप मंजूर झालेला नाही.
व्हिसाच्या मंजुरीअभावी पाकिस्तानी क्रिकेट संघ लाहोरमध्ये मुक्काम करून 27 सप्टेंबरला दुबईला जाणार आहे. तेथून ते 29 सप्टेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यासाठी हैदराबादला येतील. संघाला वेळेच्या आत व्हिसा मिळेल, असा विश्वास पाकिस्तानी व्यवस्थापनाला आहे.
भारतात होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये एकूण 10 संघ सहभागी होत आहेत. 9 विदेशी संघांपैकी केवळ पाकिस्तानला अद्याप व्हिसा मिळालेला नाही. आता पाकिस्तान संघाच्या व्हिसाला उशीर झाल्याने त्यांच्या तयारीवरही परिणाम होऊ शकतो. गेल्या 10 वर्षात पाकिस्तानचा संघ टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी 2016 मध्येच भारतात आला होता.
2012-13 मध्ये पाकिस्तानचा संघ टीम इंडियासोबत द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये एकही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. वर्ल्डकप 2023 मध्ये पाकिस्तानचा न्यूझीलंड विरुद्ध 29 सप्टेंबर रोजी सराव सामना आहे, तर त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध सराव सामना आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.