unlucky indian player esakal
क्रीडा

मिल्खा सिंग, लक्ष्य सेन ते मनु भाकर! चौथ्या क्रमांकाचं 'भूत' भारतीय खेळाडूंची पाठ सोडेना...

Paris olympic 2024 Unfortunate History of indian Athletes: २२ वर्षीय लक्ष्य सेन याच्या पराभवानंतर प्रशिक्षक प्रकाश पदुकोण यांचा पारा चढला आणि त्यांनी चौथ्या क्रमांकावर भारतीयांना येणाऱ्या अपयशावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Swadesh Ghanekar

Paris Olympic 2024 Lakshya Sen to Manu Bhaker - पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला आतापर्यंत ३ पदकं जिंकता आलेली आहेत. ही पदकाची संख्या ८ झाली असती, परंतु ५ पदकं थोडक्यात हुकली. भारतीय खेळाडू चौथ्या क्रमांकावरून पदकावीना परतण्याची परंपरा याही ऑलिम्पिक स्पर्धेत पाहायला मिळाली. लक्ष्य सेन, सात्विक-चिराग, मनु भाकर, अर्जुन बबुता आणि धीरज-अंकिता यांचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. ही पदकं जिंकली असती तर भारत पदक तालिकेत आज ६०व्या क्रमांकावर दिसला नसता, तर तो खूप वर असता...

पुरुष एकेरीच्या कांस्यपदकाच्या लढतीत लक्ष्य सेनने आघाडी घेतली होती आणि हे पदक आपलेच असे वाटू लागले होते. पण, मलेशियन खेळाडूने पुनरागमन केले आणि लक्ष्यचा १-२ असा पराभव झाला. यानंतर मुख्य प्रशिक्षक प्रकाश पदुकोण हे संतापले. सरकार तुमच्यासाठी करते आणखी त्यांनी काय करायला हवं? आता खेळाडूंनी त्यांची जबाबदारी ओळखायला हवं आणि चौथ्या क्रमांकावर येत असलेल्या अपयशाच्या मानसिक दडपणावर मात करायला हवी, असे ते म्हणाले.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिलेले खेळाडू

  • मनु भाकर - महिला २५ मीटर पिस्तुल

  • अर्जुन बबुता - पुरुष १० मीटर एअर रायफल नेमबाजी

  • धीरज बोम्मादेवरा/अंकिता भकत - मिश्र सांघिक तिरंदाजी

  • लक्ष्य सेन - पुरुष एकेरी कांस्यपदक लढत

  • महेश्वरी चौहान/अनंत जीत सिंग नरुका - स्कीट मिश्र सांघिक

ऑलिम्पिक इतिहासात चौथे राहिलेले भारतीय

  • रणधीर शिंदे ( १९२०) - ५४ किलो फ्री स्टाईल कुस्ती

  • केशव मांगवे ( १९५२) - ६३ किलो फ्री स्टाईल कुस्ती

  • भारतीय फुटबॉल संघ ( १९५६)

  • मिल्खा सिंग ( १९६०) - ४०० मीटर शर्यत

  • प्रेम नाथ ( १९७२) - ५७ किलो फ्री स्टाईल कुस्ती

  • सुदेश कुमार ( १९७२) - ५२ किलो फ्री स्टाईल कुस्ती

  • पी टी उषा ( १९८४) - ४०० मीटर अडथळ्यांची शर्यत

  • रजिंदर सिंग ( १९८४) - ७४ किलो फ्री स्टाईल कुस्ती

  • लिएंडर पेस/महेश भुपती ( २००४) - पुरुष दुहेरी गट

  • कुंजाराणी देवी ( २००४) - ४८ किलो वजनी गट, वेटलिफ्टिंग

  • जॉयदीप कर्माकर ( २०१२) - ५९ मीटर रायफल प्रॉन नेमबाजी

  • अभिनव बिंद्रा ( २०१६) - १० मीटर एअर रायफल नेमबाजी

  • सानिया मिर्झा/रोहन बोपण्णा ( २०१६)- मिश्र दुहेरी

  • दीपा कर्माकर ( २०१६) - व्हॉल्ट जिम्नॅस्टीक्स

  • अदिती अशोक ( २०२०) - गोल्फ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT