Paris 2024 Olympic and Paralympic Games will be the biggest event ever organised in France 
क्रीडा

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिंपिकचे बिगूल वाजले

३२ क्रीडा प्रकारांमध्ये ३२९ पदकांसाठी स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या (आयओसी) कार्यकारी मंडळाने पॅरिस २०२४ ऑलिंपिक स्पर्धेच्या वेळापत्रकाला मान्यता दिली आहे. उद्‍घाटन समारंभाच्या (२६ जुलै) दोन दिवस अगोदर ते ११ ऑगस्टपर्यंत १९ दिवसांमध्ये ३२ क्रीडा प्रकारांतील ३२९ पदकांसाठी ७६२ सत्रांमध्ये ही स्पर्धा रंगेल.

पहिल्या सुवर्णपदकाचे वितरण २७ जुलै रोजी, म्हणजे उद्‍घाटन समारंभाच्या दुसऱ्या दिवशी सायकलिंग, ज्युडो, तलवारबाजी, डायव्हिंग, रग्बी, नेमबाजी, जलतरण आणि स्केटबोर्डिंग या खेळांमधील स्पर्धांद्वारे केले जाईल. सर्व जलतरण आणि ॲथलेटिक्स अंतिम फेऱ्या संध्याकाळी पार पडतील. २७ जुलै रोजी पहिले जलतरण सुवर्णपदक आणि २ ऑगस्ट रोजी पहिले ॲथलेटिक्स सुवर्णपदक प्रदान केले जाईल.

‘ब्रेकिंग’, हा नवा हाय-प्रोफाइल खेळ, ९ ऑगस्ट रोजी ‘प्लेस डे ला कॉन्कॉर्ड’ येथे ऑलिंपिक पदार्पण करेल. ८ ते ११ ऑगस्ट या कालावधीत महिला आणि पुरुष हॉकी, हँडबॉल, फुटबॉल, बीच व्हॉलिबॉल, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल आणि वॉटर पोलोचे अंतिम सामने आयोजित केले जातील. नेमबाजीमध्ये, ट्रॅप मिश्रित सांघिक इव्हेंटची जागा स्कीट मिश्रित सांघिक प्रकाराने घेतली आहे.

दृष्टिक्षेपात

  • २६ जुलै २०२४ रोजी उद्‍घाटन तर ११ ऑगस्टला समारोप

  • ३२ क्रीडा प्रकारांत ३२९ पदकांसाठी ७६२ सत्रांमध्ये स्पर्धा

  • ‘ब्रेकिंग’ या नव्या खेळाचे ऑलिंपिक पदार्पणदृष्टिक्षेपात

  • २६ जुलै २०२४ रोजी उद्‍घाटन तर ११ ऑगस्टला समारोप

  • ३२ क्रीडा प्रकारांत ३२९ पदकांसाठी ७६२ सत्रांमध्ये स्पर्धा

  • ‘ब्रेकिंग’ या नव्या खेळाचे ऑलिंपिक पदार्पण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT