Paris 2024 Olympics Indian athletes Complete schedule  sakal
क्रीडा

Olympics 2024 Schedule: भारताचा ११३ जणांचा चमू Paris गाजवणार; वेळापत्रक जे माहित असायलाच हवं

India's Full Schedule for 33rd Summer Paris Olympics 2024: निरज चोप्रा, पी व्ही सिंधू यांच्यासह अनेक खेळाडूंवर भारतीयांची नजर असणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Paris 2024 Olympics India schedule: २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघ सर्वात मोठा १२४ खेळाडूंचा चमू घेऊन मैदानावर उतरला होता. चार वर्षांपूर्वी भारतीय खेळाडूंनी एकाच ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक ७ पदकं जिंकली होती. २०१२च्या लंडन ऑलिम्पिकनंतर ( ६) ही पदकांची सर्वाधिक आकडेवारी होती आणि यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ११३ भारतीय खेळाडू टोक्योचा पदकाचा विक्रम मोडतील, अशी आशा आहे. निरज चोप्रा, पी व्ही सिंधू यांच्यासह अनेक खेळाडूंवर भारतीयांची नजर असणार आहे. पण, हे भारतीय कधी, केव्हा व कुठे खेळतील हेही जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला २६ जुलैपासून सुरुवात होत आहे. पण, २४ जुलैपासून रग्बी व फुटबॉलच्या साखळी फेरीतील सामन्यांना सुरुवात होणारर आहे. भारताचा ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रवास २५ जुलैपासून सुरू होईल आणि तिरंदाज मोहीमेची सुरुवात करतील. २७ तारखेला भारत पदकाचे खाते उघडू शकतो. १० मीटर एअर रायफल स्पर्धेत संदीप सिंग, अर्जुन बबूत, एलावेनिल व्हालारिव्ह आणि रमिता हे पदकासाठी प्रयत्न करतील. स्पर्धेचा शेवटचा पदक इव्हेंट हा महिलांच्या ७६ किलो वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेतून होऊ शकतो. यात रितिका हूडा हिला पदकाची प्रबळ दावेदार मानले जात आहे.

भारताचे वेळापत्रक (Olympic Games Complete Schedule)

२५ जुलै, गुरुवार

  • तिरंदाजी - महिला वैयक्तिक रँकिंग फेरी ( दुपारी १ वाजता) आणि पुरुष वैयक्तिक रँकिंग फेरी

२६ जुलै, शुक्रवार

  • उद्घाटन सोहळा

२७ जुलै, शनिवारी

हॉकी - भारत वि. न्यूझीलंड

बॅडमिंटन - पुरुष व महिला एकेरी साखळी फेरी, पुरुष व महिला दुहेरी साखळी फेरी

बॉक्सिंग - प्राथमिक फेरी ( राऊंड ऑफ ३२)

रोईंग - पुरुष एकल स्कल हिट्स

नेमबाजी - १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक पात्रता फेरी, १० मीटर एअर रायफल पदक सामना, १० मीटर एअर पिस्तुल पात्रता फेरी

टेबल टेनिस - पुरुष व महिला एकेरी राऊंड ऑफ ६४

टेनिस - पुरुष व महिला एकेरी आणि दुहेरी प्रथम फेरी

२८ जुलै, रविवार

तिरंदाजी - महिला सांघिक फेरी राऊंड ऑफ १६ ते फायनल

रोईंग - पुरुष एकल स्कल्स रिपेचेज फेरी

नेमबाजी - १० मी. एअर रायफल महिला पात्रता, १० मी. एअर पिस्तुल पुरुषांची अंतिम फेरी, १० मी. एअर रायफल पुरुषांची पात्रता, १० मी. एअर पिस्तूल महिला अंतिम

जलतरण - पुरुषांची १०० मी. बॅकस्ट्रोक हीट्स, पुरुषांची १०० मी. बॅकस्ट्रोक उपांत्य फेरी, महिलांची २०० मी. फ्रीस्टाइल हीट्स, महिलांची २०० मी. फ्रीस्टाइल उपांत्य फेरी

२९ जुलै, सोमवार

तिरंदाजी - पुरुष सांघिक राऊंड ऑफ १६ ते फायनल

हॉकी - भारत विरुद्ध अर्जेंटिना (दुपारी ४:१५)

रोईंग - पुरुष एकल स्कल्स उपांत्य फेरी

नेमबाजी - ट्रॅप पुरुष पात्रता, १० मी. एअर पिस्तूल मिश्र सांघिक पात्रता, १० मी. एअर रायफल महिला अंतिम, १० मी. एअर रायफल पुरुष अंतिम

जलतरण - पुरुषांची १०० मी. बॅकस्ट्रोक अंतिम, महिलांची २०० मी. फ्रीस्टाइल अंतिम

टेबल टेनिस - पुरुष आणि महिला एकेरी राऊंड ऑफ ६४ व राऊंड ऑफ ३२

टेनिस - दुसऱ्या फेरीचे सामने

३० जुलै, मंगळवार

तिरंदाजी - महिला वैयक्तिक राऊंड ऑफ ६४ व राऊंड ऑफ ३२, पुरुष वैयक्तिक राऊंड ऑफ ६४ व राऊंड ऑफ ३२

घोडेस्वार - ड्रेसेज वैयक्तिक दिवस १

हॉकी – भारत विरुद्ध आयर्लंड ( दुपारी ४:४५)

रोईंग - पुरुष एकल स्कल्स उपांत्यपूर्व फेरी

नेमबाजी - ट्रॅप महिला पात्रता - पहिला दिवस, १० मी. एअर पिस्तूल मिश्र सांघिक पदक सामने, ट्रॅप पुरुषांची अंतिम फेरी

टेनिस - तिसऱ्या फेरीचे सामने

३१ जुलै, बुधवार

बॉक्सिंग - उपांत्यपूर्व फेरी

घोडेस्वार - ड्रेसेज वैयक्तिक दिवस २

रोईंग - पुरुष एकल स्कल्स उपांत्य फेरी

नेमबाजी - ५० मी. रायफल थ्री पोझिशन पुरुष पात्रता, ट्रॅप महिला अंतिम

टेबल टेनिस - राऊंड ऑफ १६

टेनिस - पुरुष दुहेरी उपांत्य फेरी

१ ऑगस्ट, गुरुवार

ऍथलेटिक्स - पुरुषांची २० किमी चालण्याची स्पर्धा, महिला २० किमी चालण्याची स्पर्धा ( सकाळी ११ नंतर)

बॅडमिंटन - पुरुष आणि महिला दुहेरी उपांत्यपूर्व फेरी, पुरुष आणि महिला एकेरी उपउपांत्यपूर्व फेरी

हॉकी- भारत विरुद्ध बेल्जियम ( दुपारी १.३० वा. )

गोल्फ - पुरुष फेरी १

ज्युडो - महिलांची ७८+ किग्रॅ राऊंड ऑफ ३२ ते फायनल

रोईंग - पुरुष एकल स्कल्स उपांत्य फेरी

नौकानयन - पुरुष आणि महिला Dinghy शर्यत १-१०

नेमबाजी - ५० मी रायफल थ्री पोझिशन पुरुषांची फायनल, ५० मी रायफल थ्री पोझिशन महिला पात्रता फेरी

टेबल टेनिस - पुरुष आणि महिला एकेरी उपांत्यपूर्व फेरी

टेनिस - पुरुष एकेरी उपांत्यपूर्व फेरी

२ ऑगस्ट, शुक्रवार

तिरंदाजी - मिश्र सांघिक उप उपांत्यपूर्व फेरी ते फायनल

ऍथलेटिक्स - पुरुष गोळाफेक पात्रता फेरी

बॅडमिंटन - महिला व पुरुष दुहेरी उपांत्य फेरी, पुरुष एकेरी उपांत्यपूर्व फेरी

हॉकी – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( दुपारी ४:४५)

गोल्फ - पुरुष दुसरी फेरी

रोईंग - पुरुष एकल स्कल्स फायनल्स

नेमबाजी - स्कीट पुरुष पात्रता, २५ मीटर पिस्तुल महिला पात्रता, ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स महिला अंतिम फेरी

टेबल टेनिस - पुरुष आणि महिला एकेरी उपांत्य फेरी

टेनिस - पुरुष एकेरी उपांत्य फेरी, पुरुष दुहेरी पदक सामने

३ ऑगस्ट, शनिवार

तिरंदाजी - महिलांची वैयक्तिक उपउपांत्यपूर्व ते अंतिम फेरी

ऍथलेटिक्स - पुरुष गोळाफेक अंतिम

बॅडमिंटन - महिला एकेरी उपांत्यपूर्व फेरी, महिला दुहेरी पदक सामने

बॉक्सिंग - महिला ६० किलो - उपांत्य फेरी

गोल्फ - पुरुष तिसरी फेरी

नेमबाजी - स्कीट पुरुष पात्रता - दिवस दुसरा, स्कीट महिला पात्रता - दिवस पहिला, २५ मीटर पिस्तूल महिला अंतिम - स्कीट पुरुष अंतिम

टेबल टेनिस - महिला एकेरी पदक सामने

टेनिस - पुरुष एकेरी पदक सामने

४ ऑगस्ट, रविवार

तिरंदाजी - पुरुषांची वैयक्तिक उपउपांत्यपूर्व ते अंतिम फेरी

ऍथलेटिक्स - महिलांची ३००० मीटर स्टीपलचेस पहिली फेरी (दुपारी 1:35), पुरुषांची लांब उडी पात्रता फेरी

बॅडमिंटन - महिला एकेरी उपांत्य फेरी, पुरुष एकेरी उपांत्य फेरी, पुरुष दुहेरी पदक सामने

बॉक्सिंग - उपांत्य फेरी

अश्वारूढ - ड्रेसेज वैयक्तिक ग्रँड प्रिक्स फ्रीस्टाइल

हॉकी - पुरुष उपांत्यपूर्व फेरी

गोल्फ - पुरुष चौथी फेरी

नेमबाजी - २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल पुरुष, स्कीट महिला पात्रता दुसरा दिवस, स्कीट महिला अंतिम

टेबल टेनिस - पुरुष एकेरी पदक सामने

५ ऑगस्ट, सोमवार

ऍथलेटिक्स - पुरुषांची ३००० मी स्टीपलचेस पहिली फेरी, महिलांची ५००० मी अंतिम फेरी

बॅडमिंटन - महिला व पुरुष एकेरी पदक सामने

नेमबाजी - स्कीट मिश्र सांघिक पात्रता, २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल पुरुषांची अंतिम फेरी, स्कीट मिश्र सांघिक पदक सामना

टेबल टेनिस - पुरुष आणि महिला सांघिक उप उपांत्यपूर्व फेरी

कुस्ती - महिला ६८ किलो उपउपांत्यपूर्व व उपांत्यपूर्व

६ ऑगस्ट, मंगळवार

ऍथलेटिक्स - पुरुष भालाफेक पात्रता, महिला ३००० मीटर स्टीपलचेस अंतिम, पुरुष लांब उडी अंतिम

बॉक्सिंग - महिला ६० किलो - अंतिम

हॉकी - पुरुष उपांत्य फेरी

सेलिंग - पुरुष आणि महिला डिंगी पदक शर्यत

टेबल टेनिस - पुरुष आणि महिला संघ उपांत्यपूर्व फेरी

कुस्ती - महिला ६८ किलो उपांत्य फेरी ते पदक सामने, महिला ५० किलो उपउपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व फेरी

७ ऑगस्ट, बुधवार

ऍथलेटिक्स - पुरुषांची ३००० मीटर स्टीपलचेस अंतिम फेरी, मॅरेथॉन, महिलांची १०० मीटर अडथळा फेरी, महिला भालाफेक पात्रता, पुरुषांची उंच उडी पात्रता, पुरुषांची तिहेरी उडी पात्रता

बॉक्सिंग - पुरुष ६३.५ किलो, पुरुष ८० किलोगट फायनल

गोल्फ - महिला पहिली फेरी

टेबल टेनिस - पुरुष आणि महिला संघ उपांत्यपूर्व फेरी, पुरुष संघ उपांत्य फेरी

वेटलिफ्टिंग - महिला ४९ किलो

कुस्ती - महिला ५० किलो उपांत्य फेरी ते पदक सामने, महिला ५३ किलो उपउपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व फेरी

८ ऑगस्ट, गुरुवार

ऍथलेटिक्स - पुरुष भालाफेक अंतिम फेरी, महिलांची १०० मीटर हर्डल्स रिपेचेज, महिला शॉट पुट पात्रता

बॉक्सिंग - पुरुष ५१ किलो, महिला ५४ किलो फायनल

हॉकी - पुरुषांचे पदक सामने

गोल्फ - महिला दुसरी फेरी

टेबल टेनिस - पुरुष आणि महिला उपांत्य फेरी

कुस्ती- महिला ५७ किलो उपउपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व फेरी, महिला ५३ किलो उपांत्य फेरीते पदक सामने, पुरुष ५७ किलो उपउपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व फेरी

९ ऑगस्ट, शुक्रवार

ऍथलेटिक्स - महिलांची ४ बाय ४०० मीटर रिले पहिली फेरी, पुरुषांची ४ बाय ४०० मीटर रिले पहिली फेरी, महिलांची १०० मीटर अडथळ्यांची शर्यत उपांत्य फेरी, महिला गोळाफेक अंतिम, पुरुषांची तिहेरी उडी अंतिम

बॉक्सिंग - पुरुष ७१ किलो, महिला ५० किलो, पुरुष ९२ किलो, महिला ६६ किलो अंतिम फेरी

गोल्फ - महिला तिसरी फेरी

टेबल टेनिस - पुरुष आणि महिला सांघिक पदक सामने

कुस्ती - महिला ५७ किलो उपांत्य फेरी ते पदक सामने, पुरुष ५७ किलो उपांत्य फेरी ते पदक सामने, महिला ६२ किलो उप उपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व फेरी

१० ऑगस्ट, शनिवार

ऍथलेटिक्स- महिला ४ बाय ४०० मीटर रिले अंतिम, पुरुष ४ बाय ४०० मीटर रिले अंतिम, महिला १०० मीटर अडथळ्याची शर्यत अंतिम, महिला भालाफेक अंतिम, पुरुष उंच उडी अंतिम

बॉक्सिंग - महिला ५७ किलो, पुरुष ५७ किलो, महिला ७५ किलो, पुरुष ९२ किलो वरील फायनल

गोल्फ - महिला चौथी फेरी

टेबल टेनिस - पुरुष आणि महिला सांघिक पदक सामने

कुस्ती - महिला ७६ किलो उपउपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व फेरी, महिला ६२ किलो उपांत्य फेरी आणि पदक सामने

११ ऑगस्ट, रविवार

कुस्ती - महिला ७६ किलो उपांत्य फेरी ते पदक सामने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT