Paris 2024 Olympics Indian jacket dominates shooting in French capital  
क्रीडा

Paris Olympics 2024: धारावीचं जॅकेट पोहचलं पॅरिस ऑलिम्पिकला, भारतीय नेमबाजांना जिंकण्यासाठी करणार मदत, ठाणेकराने बनवलीय कंपनी

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला काल पासून म्हणजेच 26 जुलै रोजी सुरुवात झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला काल पासून म्हणजेच 26 जुलै रोजी सुरुवात झाली आहे. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन हे फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे करण्यात आलं आहे. या स्पर्धेत यंदा भारताकडून 117 खेळाडू सहभागी झालं आहेत. पण या स्पर्धत चर्चा रंगली आहे ती म्हणजे नेमबाजी संघाची. (Paris 2024 Olympics Indian jacket dominates shooting in French capital )

कारण, मागील सर्व ऑलिम्पिकच्या तुलनेत भारतातून पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारताकडून सर्वात मोठा नेमबाजी संघ सहभागी झाला आहे. एकूण 21 नेमबाज 27 पदकांसाठी स्पर्धा करतील. पण या खेळाडूंसाठी त्यांना खेळताना स्थिरता मिळण्यासाठी खास जॅकेट तयार करण्यात आलं आहे. हे जॅकेटे कोणत्या परदेशी कंपनीनं नव्हे तर महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई येथील एका ठाणेकरानं तयार केलं आहे.

तर या ठाणेकराचं नाव निलेश राणे असं आहे. राणे यांनी रायफल जॅकेट बनवणारी कंपनी त्यांनी 27 वर्षांपूर्वी स्थापन केली होती. त्यांचे जॅकेटे यंदाच्या रायफेल इव्हेंटमध्ये भारतीय खेळाडू परिधान करणार आहेत. ४४ वर्षीय राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तीन वर्षांपूर्वीच्या तुलनेत कॅपेपी कंपनीने जॅकेटमध्ये चांगली सुधारणा केली आहे.

तसेच, टोकियो ऑलिम्पिकमध्ये रायफल स्पर्धांमध्ये (पुरुष आणि महिला 10 मीटर रायफल, 10 मीटर रायफल मिश्र सांघिक आणि पुरुष आणि महिला 50 मीटर रायफल थ्री पोझिशन) – पाच सुवर्ण, पाच रौप्य आणि पाच कांस्य – एकूण 15 पदके होती.

कॅपेपी जॅकेट परिधान केलेल्या नेमबाजांनी त्यापैकी आठ पदके आणि पाच सुवर्णपदकांपैकी चार पदके जिंकली. आमचे जॅकेट घातलेले नेमबाज पॅरिसमध्ये प्रत्येक पदक जिंकू शकतात. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तसेच त्यांनी आत्तापर्यंत झालेल्या नेमबाजांच्या या विजयात प्रशिक्षण, उपकरणे यांच्यासह आमच्या जॅकेटचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे असं मला वाटतं. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

राणेंच्या अंदाजानुसार, टोकियो ऑलिम्पिकमधील सुमारे ७० टक्के रायफल नेमबाज त्यांचे जॅकेट वापरत होते.

राणे यांनी तयार केलेल्या जॅकेटवर भारताचा ‘गोल्डन बॉय’ अभिनव बिंद्रानेही भाष्य केलं आहे. स्पोर्टस्टारशी बोलताना अभिनव म्हणाला, अनेक नेमबाजांना कॅपेपी ब्रॅंडचे जॅकेट कॅरी करण सोपं आहे. हे जॅकेट तयार करण्यासाठी वापरण्यात आलेलं साहित्य खुप आरामदायी आहे.

या जॅकेटमुळं नेमबाजांना आवश्यक अशी स्थिरता मिळते. त्यामुळं ऑलिम्पिक स्पर्धेत या जॅकेटच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे.

इतर बहुतेक खेळांच्या किटच्या व्यतिरिक्त, शूटिंग जॅकेट कामगिरीसाठी महत्त्वपूर्ण आहे, विशेषतः रायफल इव्हेंटमध्ये. शूटरच्या शरीराला आधार देणे हे जॅकेटचे मुख्य कार्य आहे. “रायफल इव्हेंटमध्ये, नेमबाज लक्ष्यापासून दूर आणि त्यांच्या टाचांकडे झुकतात, ही एक अनैसर्गिक स्थिती आहे. स्नायू, कंडरा आणि हाडे यांच्यावरील ताण कमी करण्यासाठी जॅकेटची सुरुवात करण्यात आली. योग्यरित्या फिट असलेले जाकीट पाठीला आधार देते आणि ते थरथरणाऱ्या शरिराला स्थिरता देते. असं बीजिंग ऑलिम्पिकमध्ये बिंद्राला सुवर्णपदक मिळवून देणारे शीर्ष प्रशिक्षक हेन्झ रेनकेमेयर म्हणतात.

राणे हे स्वतः नेमबाज होते आणि त्यांनी 1995 पासून प्रत्येक राष्ट्रीय स्पर्धेत उतरले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतःहून नेमबाची साठी जॅकेट तयार केलं होतं. जाड, कठोर एर्गोनॉमिकली जॅकेट आणि ट्राउझर्स जे नेमबाजी करताना खेळाडूला स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असते.

नेमबाजी स्पर्धेत उतरलेल्या प्रत्येक खेळाडूला युरोपमध्ये बनवलेले ड्रेसकोट खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागत होती.

पण राणेंना ही पोकळी भरून काढली, मुंबईतील धारावीच्या झोपडपट्ट्यांमध्ये एका लहानशा कार्यशाळेत बसून खेळाचे सखोल ज्ञान आणि टेलरच्या जोडीने त्यांनी नेमबाजी खेळाडूंसाठी जॅकेट तयार करण्याचे आव्हान स्विकारलं.

2002 मध्ये त्यांनी एका स्पर्धेच्या ठिकाणी शूटिंग रेंजच्या बाहेर त्यांनी केलेल्या जॅकेटचा स्टॉल लावला. पण फारशी विक्री झाली नाही. 2009 मध्ये, 15 दिवसांहून अधिक काळ स्टॉलवर बसल्यानंतर त्यांना मोजके खरेदीदार मिळाले. त्यानंतर 2020 मध्ये टोकियो येथे झालेल्या जगातील सर्वोत्तम नेमबाजांपैकी प्रत्येक दहापैकी तीन स्पर्धेदरम्यान त्यांचे जॅकेट वापरण्यात आलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार आता राणे ६० हून अधिक देशांतील शीर्ष नेमबाजांना त्यांची जॅकेट आणि ट्राउझर्स विकत आहेत. त्यांच्या क्लायंटमध्ये जागतिक विजेत्यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT