Ankita Bhakat Dhiraj Bommadevara  Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024: भारताच्या अंकिता-धीरजने उंचावल्या आशा, तिरंदाजीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Paris Olympic Archery: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीतील मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या धीरज बेम्मादेवरा आणि अंकिता भकत यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून त्यांचा हा सामना आजच संध्याकाळी होणार आहे.

Pranali Kodre

Ankita Bhakat-Dhiraj Bommadevara in Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील सातव्या दिवसाच्या खेळांना सुरुवात झाली आहे. या दिवशी तिरंदाजीतील मिश्र दुहेरीचे सामने खेळवले जात आहेत. यामध्ये शुक्रवारी भारताकडून धीरज बेम्मादेवरा आणि अंकिता भकत यांची जोडी उतरली होती. या दोघांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यात यश मिळवले आहे.

धीरज आणि अंकिता यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या दिआनंद कोइरुनसिमा आणि अरिफ पेंगस्तू यांना ५-१ गुणांच्या फरकाने पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये भारतीय जोडीने ३७-३६ अशा एका पाँइंटच्या फरकाने आघाडी घेतल्याने त्यांना २ गुण मिळाले.

दुसरा सेट ३८-३८ असा बरोबरीत राहिल्याने दोन्ही जोड्यांना प्रत्येकी १ गुण मिळाला. त्यानंतरच्या तिसऱ्या सेटमध्ये ३८-३७ अशा फरकाने भारताने आघाडी घेतली आणि २ गुण मिळवले. त्यामुळे अंकिता आणि धीरज यांनी विजय निश्चित केला.

दरम्यान, आता उपांत्यपूर्व फेरीत अंकिता आणि धीर यांचा सामना स्पेनच्या एलिया कॅनालेस आणि पाब्लो गोन्झालेज अछा या जोडीविरुद्ध होणार आहे. स्पेनच्या जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीत चीनच्या जोडीला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.

आता भारत आणि स्पेन यांच्यात होणारा उपांत्यपूर्व सामना शुक्रवारीच म्हणजे आज संध्याकाळी ५.३० वाजता होणार आहे. जर हा सामना जिंकला, तर आजच संध्याकाळी ७ वाजता उपांत्य सामनाही पार पडेल. आणि त्यानंतर पदकांसाठीच्या लढतीही होणार आहेत.

Ankita Bhakat Dhiraj Bommadevara

तथापि, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की धीरज आणि अंकिता हे वैयक्तिक प्रकारातही सहभागी झाले होते. मात्र त्यांना राऊंड ऑफ ३२ च्या पुढे जाता आले नाही.

तसेच भारताच्या महिला आणि पुरुष तिरंदाजी संघांचा सांघिक प्रकारातही उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

ज्यूदोमध्ये तुलिका मानचं पदार्पण

शुक्रवारी भारताची तुलिका मान ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले. तिचा पहिलाच सामना क्युबाच्या दिग्गज इडॅलिस ऑर्टिझविरुद्ध झाला. या सामन्यात इडॅलिस ऑर्टिझने तुलिकाला पराभूत केल्याने तिचं आव्हान संपलं. इडॅलिस ऑर्टिझ पाचव्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली असून तिने चारवेळा पदकेही जिंकली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore : 'रात्रीचे खेळ सांगायला आम्हाला भाग पाडू नका'; आमदार जयकुमार गोरेंचा कोणाला इशारा?

Latest Maharashtra News Updates :सोशल मीडिया इन्फ्लून्सरवर पोलिसांची कारवाई; चाकूचा धाक दाखवून धमकी दिल्याचे प्रकरण अंगावर

IND vs SA : आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात Axar Patel चा अफलातून कॅच; करून दिली ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची आठवण

BSNL IFTV : BSNLने सुरु केली पहिली इंट्रानेट टीव्ही सेवा; 500+ लाईव्ह चॅनेल्स अन् OTT प्लॅटफॉर्म्सचं कनेक्शन कसं घ्यायचं? वाचा

'उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी दगाबाजी केली अन् काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसले'; विनोद तावडेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT