Paris Olympic 2024 Ceremony esakal
क्रीडा

Paris Olympic 2024 Ceremony: पॅरिस ऑलिंपिकच्या लाईव्ह स्ट्रिमिंगचा आनंद घ्या, तो ही मोफत; जाणून घ्या कसं?

Monika Lonkar –Kumbhar

Paris Olympic 2024 Ceremony : मागील कित्येक दिवसांपासून पॅरिस ऑलिंपिक २०२४ ची सर्वांना उत्सुकता लागली आहे. संपूर्ण जगाला वेध लागलेल्या पॅरिस ऑलिंपिकला २०२४ आज सुरूवात होणार आहे. क्रीडाप्रेमींसाठी आणि खेळाडूंसाठी सर्वात मोठी पर्वणी असलेल्या पॅरिस ऑलिंपिकचे उद्घाटन आज फ्रान्समधील सीन नदीच्या किनाऱ्यावर होणार आहे.

यंदाच्या पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये २०० हून अधिक देशांमधील सुमारे १०, ५०० खेळाडू सहभागी होणार आहेत. या खेळाडूंमध्ये ११७ भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे. या पॅरिस ऑलिंपिकची सुरूवात २६ जुलैपासून (शुक्रवार) होणार आहे. तसेच, ११ ऑगस्टला या पॅरिस ऑलिंपिकची समाप्ती होईल.

पॅरिस ऑलिंपिकच्या उद्घाटनाचा दिमाखदार सोहळा भारतीय वेळेप्रमाणे आज रात्री ११ वाजता सुरू होणार असून, दुसऱ्या दिवशी अर्थात २७ जुलैला (शनिवार) पहाटे २ वाजेपर्यत हा सोहळा सुरू राहिल. हा लाईव्ह पॅरिस ऑलिंपिक सोहळा जर तुम्हाला घरच्या घरी आणि तो ही फ्रीमध्ये पाहायचा असेल तर तो कसा पाहायचा? याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पॅरिस ऑलिंपिक २०२४ लाईव्ह स्ट्रिमिंग कसे पाहायचे?

पॅरिस ऑलिंपिक २०२४ चा उद्घाटन सोहळा २६ जुलै (शुक्रवार) २०२४ रोजी भारतीय वेळेनुसार, रात्री ११ वाजता सुरू होणार आहे. या दिमाखदार सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलमध्ये रिलायन्स जिओ कंपनीचे Jio Cinema अ‍ॅप डाऊनलोड आणि इन्स्टॉल करावे लागेल.

हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर आणि Apple App Store वर उपलब्ध आहे. त्यामुळे, हे अ‍ॅप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सहज डाऊनलोड करू शकता.

तुमच्या मोबाईलवर तुम्ही Jio Cinema हे अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर, तुम्हाला आता फक्त तुमचा मोबाईल नंबर तिथे अ‍ॅड करायचा आहे. हा मोबाईल नंबर अ‍ॅड केल्यानंतर तुम्हाला अ‍ॅपमध्ये लॉग इन करता येईल. एकदा तुम्ही अ‍ॅपमध्ये लॉग इन केले की, तुम्हाला पॅरिस ऑलिंपिक २०२४ चा लाईव्ह उद्घाटन सोहळा विनामूल्य पाहता येईल.

शिवाय, घरच्या घरी फ्रीमध्ये बसून, तुम्हाला हा सोहळा 'याची देही याची डोळा' पाहता येईल. एवढेच नाही तर पॅरिस ऑलिंपिक २०२४ शी निगडीत विविध खेळांशी संबंधित प्रत्येक लहान-मोठी अपडेट तुम्हाला सकाळ वेबसाईटच्या क्रीडा विभागावर ही पाहता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT