Paris Olympic 2024 Day 10 Schedule Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024, Day 10: लक्ष्य सेन ब्राँझ मेडल मिळवणार? महाराष्ट्राचा अविनाश साबळेही उतरणार मैदानात, पाहा आजचं वेळापत्रक

Paris Olympic 2024 India Schedule on 5th August: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दहाव्या दिवशी लक्ष्य सेनला ब्राँझ मेडल जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे, तर महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळेही मैदानात उतरणार आहे. दरम्यान, या दिवसाचं वेळापत्रक कसं असेल, जाणून घ्या.

Pranali Kodre

Paris Olympic 2024 India Schedule on Day 10 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत १० व्या दिवसाचे खेळ सोमवारी खेळले जाणार आहेत. या दिवशी भारताच्या खात्यात आणखी पदकाची भर पडू शकते.

दहाव्या दिवसापर्यंत भारताचे अनेक क्रीडा प्रकारातील आव्हान संपले असले तरी आणखी काही क्रीडा प्रकारात पदकांची आशा कायम आहे. दहाव्या दिवशीही अनेक क्रीडा प्रकारात भारताचे खेळाडू खेळताना दिसणार आहेत.

सोमवारी सर्वात महत्त्वाचा सामना म्हणजे बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेन कांस्य पदकाचा सामना खेळणार आहे. त्याला मलेशियाच्या झी जिया ली याच्यावरुद्ध हा सामना खेळायाचा आहे. लक्ष्य सेनने जर पदक जिंकले, तर तो सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांच्यानंतर ऑलिम्पिक मेडल जिंकणारा तिसराच भारतीय बॅडमिंटनपटू ठरेल, तर पहिलाच भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरेल.

याशिवाय ऍथलेटिक्समध्ये महिलांच्या ४०० मीटरची शर्यतीची क्वालिफायर्स होणारेत, त्यात किरण पहल सहभागी होणार आहे. तसेच पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळे सहभागी होईल.

टेबल टेनिसमध्येही भारत आणि रोमानिया संघात राऊंड ऑफ १६ चा सामना होणार आहे. नेबमाजीत स्किट प्रकारातील मिश्र दुहेरीचे क्वालिफायर्स होतील. कुस्तीलाही सुरुवात होत असून निशा दहिया ६८ किलो वजनी गटात खेळेल.

दहाव्या दिवसाचं वेळापत्रक (५ ऑगस्ट)

नेमबाजी

  • स्कीट मिश्र सांघिक क्वालिफायर्स (दुपारी १२.३० वाजता) (महेश्वरी चौहान - अनंतजीत सिंग)

  • स्कीट मिश्र सांघिक फायनल (संध्या ६.३० वाजता) (जर पात्र ठरले तर)

टेबल टेनिस

  • महिला सांघिक उपउपांत्यपूर्व फेरी (भारत विरुद्ध रोमानिया) (दुपारी १.३० वाजता)

ऍथलेटिक्स

  • महिला ४०० मीटर प्राथमिक फेरी (दुपारी ३.२५ वाजता) (किरण पहल)

  • पुरुष ३००० मीटर स्टीपलचेस (रात्री १०.३४ वाजता)(अविनाश साबळे)

सेलिंग

  • महिला डिंघी शर्यत ९ व १० (दुपारी ३.४५ वाजता) (नेत्रा कुमानन)

  • पुरुष डिंघी शर्यत ९ व १० (संध्या. ६.१० वाजता)((विष्णू सर्वानन)

बॅडमिंटन

  • पुरुष एकेरी कांस्य पदकासाठी लढत (संध्या ६ वाजल्यापासून) (लक्ष्य सेन)

कुस्ती

  • महिला ६८ किलो फ्रीस्टाईल राऊंड ऑफ १६ (संध्या ६.३० वाजल्यापासून) (निशा दहीया)

  • महिला ६८ किलो फ्रीस्टाईल क्वार्टरफायनल (संध्या ७.५० वाजल्यापासून) (पात्र ठरली तर)

  • महिला ६८ किलो फ्रीस्टाईल उपांत्य फेरी (मध्यरात्री १.१० वाजता (६ ऑगस्ट) (पात्र ठरली तर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT