India in Paris Olympic 2024 Day 2 results Sakal
क्रीडा

India in Paris Olympic Day 2: मनू भाकरचं पहिलं पदक, तर अर्जून-रमितानेही उंचावल्या आशा; मात्र तिरंदाजी अन् टेबल टेनिसमध्ये निराशा

Pranali Kodre

India in Paris Olympic 2024 Day 2 results: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी २२ वर्षीय नेमबाज मनू भाकरने कांस्य पदकाला गवसणी घातली आणि भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकांचं खातंही उघडलं.

तिनं मोठं यश मिळवलं असलं, तरी रविवारचा दिवस हा भारतासाठी संमिश्र ठरला. काही स्टार खेळाडूंना या स्पर्धेतूनच बाहेर व्हावं लागलंय. रविवारच्या दिवसात काय काय झालंय यावरच एक नजर टाकू.

नेमबाजी

नेमबाजीत मनू भाकरनं १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक जिंकलं. ती ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिलीच भारतीय महिला नेमबाज ठरली. तसेच २०१२ नंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिलीच नेमबाज ठरली.

याशिवाय अर्जुन बबुता आणि रमिता जिंदाल यांनीही पदकांच्या आशा उंचावल्यात. रमिताने महिलांच्या १० मीटर एअर रायफलच्या पात्रता फेरीत पाचवे स्थान पटकावत अंतिम फेरीत प्रवेश केला. अर्जुन याने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलच्या पात्रता फेरीत सातवे स्थान पटकावत अंतिम फेरी गाठली आहे. आता हे दोघही सोमवारी पदकासाठी खेळतील.

दरम्यान, या दोघांनी अंतिम फेरीत स्थान मिळवलं असलं तरी इवानिल वलारिवन आणि संदीप सिंग यांना पात्रता फेरीतूनच बाहेर जावं लागलं. वलारिवन महिलांच्या १० मीटर एअर रायफलच्या पात्रता फेरीत १० व्या क्रमांकावर राहिली, तर संदीप पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलच्या पात्रता फेरीत १२ व्या क्रमांकावर राहिला.

बॅडमिंटन

रविवारी बॅडमिंटनमध्ये महिला एकेरी गटात भारताच्या पीव्ही सिंधूचा सामना मालदीवच्या फातिमाथ नाभा अब्दुल रझाकविरुद्ध झाला. या सामन्यात सिंधूने २१-९, २१-६ असा सोपा विजय मिळवला. तसेच पुरुष एकेरी गटात भारताच्या एचएस प्रणॉयचा सामना जर्मनीच्या फॅबियन रोथविरुद्ध झाला. या सामन्यात प्रणॉयने २१-१८, २१-१२ असा विजय मिळवला.

रोइंग

भारताचा रोवर बलराज पनवार याने पुरुष एकेरी स्कल्स रोइंग क्रीडा प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. रविवारी झालेल्या रेपेचेजमध्ये तो दुसऱ्या हिटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने रेपेजेचमध्ये त्याची शर्यत ७ मिनिटे आणि १२.४१ सेकंदात पूर्ण केली. त्याच्यापुढे मोनॅकोचा क्वेन्टिन अँडोगनेली राहिला. त्याने ७ मिनिटे आणि १० सेकंदात शर्यत पूर्ण केली.

टेबल टेनिस

टेबल टेनिसमध्ये महिला एकेरीत भारताच्या श्रीजा अकुलाने स्विडनच्या ख्रिस्तिना कॉलबर्गविरुद्ध ४-० ने विजय मिळवला, तर मनिका बत्राने ग्रेट ब्रिटनच्या ऍना हर्सीविरुद्ध ४-१ ने विजय मिळवला.

पुरुष एकेरीत भारताला मोठा धक्का बसला. अनुभवी शरथ कमलला स्लोवेनियाच्या डेनी कोझुलकडून २-४ अशा फरकाने पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे त्याचे आव्हान संपुष्टात आले आहे. तसेच भारताचा हरमीत देसाई देखील पराभूत झाला. त्याला फ्रान्सच्या फेलिक्स लेब्रुनकडून ०-४ असा पराभव स्विकारावा लागला.

जलतरण

भारताचा श्रीहरी नटराज आणि १४ वर्षांची धिनीधी देसिंघू या दोघांनाही सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवता आला नाही. १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात दुसऱ्या हिट्समध्ये श्रीहरी ५५.०१ सेकंद वेळ नोंदवत दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

मात्र सर्व हिट्समधून सर्वात कमी वेळ नोंदवणारे १६ खेळाडूच सेमीफायनलमध्ये प्रवेश दिला जाणार होता. यात श्रीहरी ४६ जणांमध्ये ३३ व्या क्रमांकावर राहिला.

तसेच धिनीधी देसिंघू २०० मीटर फ्रिस्टाईल प्रकारात पहिल्या हिटमध्ये २:०६.९६ सेंकद वेळ नोंदवत अव्वल क्रमांकावर राहिली होती. मात्र तिलाही टॉप १६ मध्ये स्थान मिळवता आले नाही. ती ३१ जणींमध्ये २३ व्या क्रमांकावर राहिली.

टेनिस

पुरुष एकेरीमध्ये भारताच्या सुमीत नागलला फ्रान्सच्या कोरेन्टीन मौटेटविरुद्ध २-६, ६-२, ५-७ अशा तीन सेटमध्ये पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे त्याला या स्पर्धेतून बाहेर जावं लागलं.

तिरंदाजी

महिला रिकर्व्ह सांघिक क्वार्टर फायनलमध्ये भारतीय संघ नेदरलँड्सविरुद्ध पराभूत झाला. भारतीय संघात अंकिता भकत, भजन कौर आणि दिपीका कुमारी यांचा समावेश होता. भारताला नेदरलँड्सने ६-० फरकाने पराभूत केले.

बॉक्सिंग

बॉक्सिंगमध्ये ५० किलो वजनी गटात भारताच्या निखत झरिनने जर्मनीच्या मॅक्सी कॅरिना क्लोएत्झरचा ५-० असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : नरेंद्र मोदी कार्यक्रमस्थळी दाखल

IND vs BAN 1st Test : रोहितकडून Mohammad Siraj वर अन्याय, नेटिझन्स नाराज; पण, बांगलादेशला दिसले 'आकाश' Video

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

SCROLL FOR NEXT