India Schedule at Paris Olympic 2024 Day 4 Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024: मनू भाकरला दुसरं मेडल जिंकण्याची संधी; रोइंग, बॉक्सिंग अन् हॉकीचेही रंगणार सामने, पाहा चौथ्या दिवसाचं वेळापत्रक

Paris Olympic 2024 India Schedule on 30th July: मंगळवारी नेमबाज मनू भाकर आणि सरबजोत सिंग ब्राँझ मेडलसाठी निशाणा साधताना दिसणार आहेत. याशिवाय घोडेस्वारीमध्येही भारताची मोहिम सुरू होत आहे. एकूणच भारताचं चौथ्या दिवसाचं वेळापत्रक कसं असेल, जाणून घ्या.

Pranali Kodre

Paris Olympic 2024 Schedule on 30th July : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा हळुहळू रंगत चालली आहे. भारतीय खेळाडूंनी अनेक खेळात चमकदार कामगिरी केली असली, तर अनेक स्पर्धांमध्ये निराशाही हाती लागली आहे. टेनिस आणि जलतरण प्रकारातील भारताचे आव्हान संपले आहे.

दरम्यान आता चौथ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी भारताच्या पदकांच्या खात्यात आणखी दोन पदकांची भर पडू शकते. चौथ्या दिवशी भारतीय खेळाडू नेमबाजी, रोईंग, तिरंदाजी, घोडेस्वारी, हॉकी, बॉक्सिंग अशा वेगवेगळ्या खेळात खेळताना दिसणार आहेत.

महत्त्वाचं म्हणजे मिश्र सांघिक १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सरबजोत सिंग आणि मनू भाकर यांची जोडी कांस्य पदकाच्या सामन्यासाठी पात्र ठरली आहे. त्यांचा हा सामना मंगळवारी होणार आहे. याशिवाय ट्रॅप प्रकारात पृथ्वीराज तोंडलईमन याने अंतिम फेरी गाठली, तर त्यालाही पदक जिंकण्याची संधी असेल.

तसेच रोइंगमध्ये बलराज पनवार क्वार्टरफायनलमध्ये उतरेल. जर तो यातून सेमीफायनलसाठी पात्र ठरला, तर भारतासाठी ही ऐतिहासिक कामगिरी ठरेल. हॉकीमध्ये भारतीय संघाचा सामना आयर्लंडशी होणार आहे. जर भारताने हा सामना जिंकला, तर पुढच्या फेरीत जाण्याच्या आशा आणखी मजबूत होणार आहेत.

याशिवाय बॉक्सिंगमध्ये अमित पांघल, प्रीती पवार आणि जास्मिन लॅब्मोरिया रिंगणात असणार आहे. बॅडमिंटनमध्ये सात्विक - चिरागची जोडीही खेळताना दिसेल, तर अश्विनी आणि तनिषा या दोघींची जोडीही दोन पराभवानंतर विजय मिळवण्याचा प्रयत्नात असतील.

चौथ्या दिवसाचं वेळापत्रक (३० जुलै)

नेमबाजी

  • पुरुष ट्रॅप क्वालिफायर्स (दुपारी १२.३० वाजता) (पृथ्वीराज तोंडईमन)

  • महिला ट्रॅप क्वालिफायर्स पहिला दिवस (दुपारी १२.३० वाजता) राजेश्वरी कुमारी आणि श्रेयसी सिंग)

  • पुरुष ट्रॅप फायनल (संध्या. ७ वाजता) (जर पात्र ठरला तर)

  • मिश्र सांघिक १० मीटर एअर पिस्तुल (कांस्य पदकासाठी सामना) (दुपारी १ वाजता) (सरबजोत सिंग आणि मनू भाकर)

रोइंग

  • पुरुष सिंगल स्कल क्वार्टरफायनल (दुपारी १.४० वाजता) (बलराज पनवार)

तिरंदाजी

  • महिला वैयक्तिक राऊंड ऑफ ६४ (दुपारी १.४४ वाजल्यापासून) (अंकिता भकत, भजन कौर)

  • महिला वैयक्तिक राऊंड ऑफ ३२ (दुपारी २.२३ वाजता) (जर पात्र ठरले तर)

  • पुरुष वैयक्तिक राऊंड ऑफ ६४ (संध्या. ७.१५ वाजता) (धीरज बोम्मादेवरा)

  • पुरुष वैयक्तिक राऊंड ऑफ ३२ (संध्या. ७.५५ वाजता) (जर पात्र ठरले तर)

घोडेस्वारी

  • ड्रेसेज वैयक्तिक ग्रँड प्रिक्स पहिला दिवस (दुपारी २.३० वाजता) (अनुश अगरवाल्ला)

हॉकी

  • भारत विरुद्ध आयर्लंड (दुपारी ४.४५ वाजता)

बॅडमिंटन

  • पुरुष दुहेरी ग्रुप स्टेज (संध्या. ५.३० वाजता) (सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी)

  • महिला दुहेरी ग्रुप स्टेज (संध्या. ६.२० वाजल्यापासून) (अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्तो)

बॉक्सिंग

  • पुरुष ५१ किलो वजनी गट राऊंड ऑफ १६ (संध्या. ७.१६ वाजता) (अमित पांघल)

  • महिला ५७ किलो वजनी गट राऊंड ऑफ ३२ (रात्री ९.२४ वाजता) (जास्मिन लॅब्मोरिया)

  • महिला ५४ किलो वजनी गट राऊंड ऑफ १६ [मध्यरात्री १.२२ वाजता (३१ जुलै)] (प्रीती पवार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT