Paris Olympic 2024 India Schedule on 1 August Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024, Day 6: भारताला नेमबाजीत तिसरं मेडल मिळणार? लक्ष्य सेन अन् प्रणॉय एकमेकांविरुद्धच लढणार; पाहा आजचं वेळापत्रक

Paris Olympic 2024 India Schedule on 1 August: सहाव्या दिवशी भारताला नेमबाजीत तिसरं मेडल मिळू शकतं. याशिवाय भारताच्याच लक्ष्य सेन विरुद्ध एचएस प्रणॉय यांच्यात बॅडमिंटनचा महत्त्वाचा सामना होणार आहे. तसेच ऍथलेटिक्समध्येही भारताची सुरुवात होणार आहे. एकूणच या दिवसाचं वेळापत्रक कसं असेल जाणून घ्या

Pranali Kodre

Paris Olympic 2024 Schedule on 1 August: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील पाच दिवसांचे खेळ संपले आहेत. या पाच दिवसात भारताच्या खात्यात २ पदके आहेत. आता तिसरं पदक स्पर्धेच्या सहाव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी येऊ शकतं. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे.

त्यामुळे गुरुवारी तो पदक मिळवण्यासाठी निशाणा साधताना दिसणार आहे. जर त्यानं पदक जिंकलं तर यंदाच्या ऑलिम्पिकमधलं हे नेमबाजीतील तिसरं पदक ठरेल. इतकंच नाही तर पहिल्यांदाच एकाच ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीतून भारताच्या खात्यात ३ पदकं जमा होतील.

इतकंच नाही तर बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारताचेच दोन खेळाडू लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय आमने-सामने असणार आहेत. तसेच पीव्ही सिंधू, सात्विक-चिराग यांचेही सामने होणार आहेत.

याशिवाय भारताच्या ऍथलेटिक्समधील मोहिमेलाही सुरुवात होत आहे. आज २० किलोमीटर चालण्याच्या शर्यत होणार आहे. पुरुष गोल्फचीही पहिली फेरी गुरुवारी सुरू होत असून यात भारताचे शुभंकर शर्मा आणि गगनजीत भुल्लर सहभागी होणार आहेत.

हॉकीमध्ये भारताचा सामना बलाढ्य बेल्जियमविरुद्ध होणार आहे. बॉक्सिंगमध्ये निखत झरिन रिंगणात उतरेल, तर तिरंदाजीत महाराष्ट्राचा प्रवीण जाधव निशाणा साधताना दिसणार आहे. त्याचबरोबर महिलांच्या सेलिंगमध्ये नेत्रा कुमनन उतरणार आहे. एकूणच भारतासाठी सहावा दिवस कसा असेल जाणून घेऊ.

सहाव्या दिवसाचं वेळापत्रक (१ ऑगस्ट)

ऍथलेटिक्स

  • पुरुष २० किमी चालण्याची शर्यत (सकाळी ११ वाजता) (अक्षदीप सिंग, विकास सिंग, परमजीत सिंग)

  • महिलांची २० किमी चालण्याची शर्यत (दुपारी १२.५० वाजता) (प्रियंका गोस्वामी)

नेमबाजी

  • पुरुष ५० मीटर रायफल थ्री पोझिशन फायनल (दुपारी १.०० वाजता) (स्वप्निल कुसळे)

  • महिला ५० मीटर रायफल थ्री पोझिशन क्वालिफायर्स (दुपारी ३.३० वाजता) (सिफत कौर सामरा, अंजुम मौदगिल)

बॅडमिंटन

  • पुरुष एकेरी उपउपांत्यपूर्व फेरी (दुपारी १२ वाजल्यापासून) (लक्ष्य सेन विरुद्ध एचएस प्रणॉय)

  • पुरुष दुहेरी क्वार्टरफायनल (दुपारी ४.३० वाजल्यापासून) (सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी)

  • महिला एकेरी उपउपांत्यपूर्व फेरी (रात्री १० वाजल्यापासून) (पीव्ही सिंधू)

गोल्फ

  • पुरुष वैयक्तिक स्ट्रोक प्ले पहिली फेरी (दुपारी १२.३० वाजता)(शुभंकर शर्मा, गगनजीत भुल्लर)

हॉकी

  • भारत विरुद्ध बेल्जियम (दुपारी १.३० वाजता)

बॉक्सिंग

  • महिला ५० किलो वजनी गट राऊंड ऑफ १६ (दुपारी २.३० वाजता) (निखत झरिन)

तिरंदाजी

  • पुरुष वैयक्तिक राऊंड ऑफ ६४ (दुपारी २.३१ वाजता) (प्रवीण जाधव)

  • पुरुष वैयक्तिक राऊंड ऑफ ३२ (दुपारी ३.१०) (जर पात्र ठरला तर)

सेलिंग

  • पुरूष डिंघी शर्यत १ आणि २ (दुपारी ३.४५ वाजता) (विष्णू सरावनन)

  • महिला डिंघी शर्यत १ आणि २ (संध्या. ७.०५ वाजता) (नेत्रा कुमनन)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी दगाबाजी केली अन् काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसले'; विनोद तावडेंचा घणाघात

'धोनी, विराट, रोहित, द्रविड... यांनी लेकाच्या आयुष्याची १० वर्ष वाया घालवली'; Sanju Samsonच्या वडिलांचा खळबळजनक दावा

"सेटवर छडी घेऊन वावर आणि सहकलाकारांनी दिलेला त्रास" ; सविता यांनी सांगितला 'त्या' मालिकेच्या सेटवरील भयंकर अनुभव

Latest Maharashtra News Updates : माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन

Winter Geyser Service Tips: हिवाळ्यात वेळीच करून घ्या सर्व्हिसिंग, अन्या होईल नुकसान

SCROLL FOR NEXT