Paris Olympic 2024 Day 9 Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024: भारतासाठी 'सुपर संडे'! लक्ष्य सेन, लवलिना मेडल पक्कं करणार अन् हॉकी संघ सेमीफायनल गाठणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Pranali Kodre

Paris Olympic 2024 Schedule on 4th August : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील नववा दिवस भारतासाठी सुपर संडे ठरू शकतो. कारण रविवारी अनेक महत्त्वाचे सामने दिवसभरात पाहायला मिळणार आहे.

यातील पहिला महत्त्वाचे सामने म्हणजे भारतीय हॉकी संघ क्वार्टरफायनलमध्ये ग्रेट ब्रिटनविरुद्ध खेळणार आहे. हा सामना भारताने जिंकल्यास ते पदकाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकणार आहेत.

दुसरा महत्त्वाचा सामना म्हणजे बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेन सेमीफायनल खेळणार आहे. त्यानं हा सामना जिंकला तर तो पदक निश्चित करेल, तर हरला तरी त्याला कांस्य पदकाचा सामना खेळण्याची संधी असणार आहे.

याशिवाय लवलिना बोर्गोहेनही बॉक्सिंगमध्ये क्वार्टरफायनलमध्ये खेळणार आहे. त्यामुळे तिनेही विजय मिळवला, तर ती देखील मेडल निश्चित करेल.

त्याचबरोबर पुरुषांची २५ मीटर पिस्तुल प्रकाराची क्वालिफायर्सही रविवारी होणार आहे, तर गोल्फचा चौथा राऊंड होईल. ऍथलेटिक्समध्येही भारताची पारुल चौधरी ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सहभागी होणार आहे, तर लांब उडीमध्ये जेस्विन अल्ड्रीन ऍक्शनमध्ये दिसेल. एकूणच नवव्या दिवशीचं वेळापत्रक कसं असेल, हे जाणून घेऊ.

नवव्या दिवसाचं वेळापत्रक (४ ऑगस्ट)

नेमबाजी

  • पुरुष २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल क्वालिफिकेशन स्टेज-१ (दुपारी १२.३० वाजता) (अनिश भानवाला, विजयवीर सिद्धू)

  • पुरुष २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल क्वालिफिकेशन स्टेज-२ (दुपारी ४.३० वाजता) (अनिश भानवाला, विजयवीर सिद्धू)

  • महिला स्किट क्वालिफायर्स दुसरा दिवस (दुपारी १ वाजता) (महेश्वरी चौहान, रिझा धिल्लोन)

  • महिला स्किट फायनल (संध्या. ७.०० वाजता) (जर पात्र ठरले तर)

गोल्फ

  • पुरुष वैयक्तिक स्ट्रोक प्ले चौथी फेरी (दुपारी १२.३० वाजता)(शुभंकर शर्मा, गगनजीत भुल्लर)

हॉकी

  • भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन (क्वार्टरफायनल) (दुपारी १.३० वाजता)

ऍथलेटिक्स

  • महिला ३००० स्टीपलचेस राऊंड-१ (दुपारी १.३५ वाजता) (पारुल चौधरी)

  • पुरुष लांब उडी क्वालिफायर्स (दुपारी २.३० वाजता) (जेस्विन अल्ड्रिन)

बॉक्सिंग

  • महिला ७५ किलो वजनी गट क्वार्टरफायनल (दुपारी ३.०२ वाजता) (लवलिना बोर्गोहेन)

बॅडमिंटन

  • पुरुष एकेरी सेमीफायनल (दुपारी २.२० वाजल्यापासून) (लक्ष्य सेन)

सेलिंग

  • पुरुष डिंघी रेस ७ आणि ८ (दुपारी ३.३५ वाजल्यापासून) (विष्णू सर्वनन)

  • महिला डिंघी रेस ७ आणि ८ (संध्या. ६.०५ वाजल्यापासून) (नेत्रा कुमनन)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update: शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता, पुणे-मुंबईत काय असेल परिस्थिती?

आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2024

अग्रलेख : एकदाच काय ते...

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT