An Se-young Sakal
क्रीडा

An Se-young : 'पुरुष खेळाडूंचे अंतवस्त्रही धुवायला लावले...' पॅरिस ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या बॅडमिंटनपटूचा खळबळजनक खुलासा

An Se-young Exposes Bullying in South Korean Badminton Team: दक्षिण कोरियाच्या ऍन-से यंग या खेळाडूने महिलांच्या एकेरी प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. पण तिला अनेक वर्षे सिनियर खेळाडूंकडून छळाचा सामना करावा लागला होता. आता या प्रकरणातील खुलासे समोर येत आहेत.

Pranali Kodre

An Se-young Exposes Bullying by South Korean Badminton Team : जुलै-ऑगस्ट २०२४ दरम्यान पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या ऍन-से यंग या खेळाडूने महिलांच्या एकेरी प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. पण तिच्या या यशामागे अनेक वेदना असल्याचे आता समोर येत आहे. तिचा दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय संघाकडून छळ करण्यात आल्याचे समोर आले आहे.

दक्षिण कोरियातील मिडिया रिपोर्ट्सनुसार तिला वर्षानुवर्षे शारिरीक आणि शा‍ब्दिक आत्याचाराचा सामना करावा लागला आहे. तसेच तिला अनेक अपमानास्पद कामंही करायला लावण्यात आली, ज्यात पुरुष खेळाडूंची अंतवस्त्रही तिला धुण्यासाठी सांगण्यात येत होते. ही सर्व धक्कादायक माहिती दक्षिण कोरियाच्या संसदेने केलेल्या तपासानंतर समोर आले आहे.

या तपासात उघड झाले की से-यंग ही प्रतिभाशाली खेळाडू असूनही तिला अनेक वर्षे अत्याचार सहन करावा लागला आहे. रिपोर्ट्सनुसार प्रशिक्षक आणि वरिष्ठ खेळाडू तिला अगदी त्यांचे किरकोळ कामंही करायला सांगत होते. यामध्ये त्यांचे कपडेही ते धुवायला सांगायचे. तिला त्यांच्या शा‍ब्दिक मारालाही समोरे जावे लागले.

खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून असं दिसून आलं आहे की वरिष्ठ खेळाडूंकडून युवा खेळाडूंना असा त्रास दिला जात आहे. दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन संघ याचा सामना बऱ्याच वर्षांपासून करत आहे. याबाबत से-यंगने तक्रारही केली होती. मात्र कोरिया बॅडमिंटन असोसिएशनने या प्रकरणारडे डोळेझाक केली. तसेच त्यांच्या खेळाडूंना संरक्षणही ते देऊ शकले नाहीत.

दरम्यान, असेही लक्षात आले आहे की से-यंग बाबतच ही समस्या नाही, तर ही संघातील एक मोठी समस्या आहे. दक्षिण कोरिया संसदेकडून कोरिया बॅडमिंटन असोसिएशनची तपासणी अजूनही सुरू आहे. या प्रकरणानंतर आता खेळाडूंचा छळ आणि भ्रष्टाचार या आरोपांमुळे अधिकाऱ्यांना पदभार सोडावा लागण्याचीही शक्यता आहे.

तसेच असेही रिपोर्ट्स समोर आले आहेत की खेळाडूंची इच्छा नसतानाही अधिकारी त्यांना काही ब्रँड्सच्या जाहिराती करायला लावत होते.

से-यंग हिने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर उघडपणे कोरिया बॅडमिंटन असोसिएशनवर टीका केली होती. तिने ७ वर्षे ज्या वातावरणात काढली, त्यावर टीका केली होती. त्यानंतर तिच्या समस्यांकडे अधिक लक्ष देण्यात आले.

यावर्षाच्या सुरुवातीला स्पॉन्सर्सने पुरविलेल्या शुजबाबतही तिने तक्रार केली होती, पण तिला त्यातही काही मदत देण्यात आली नव्हती. दरम्यान आता जी तपासणी कोरिया बॅडमिंटन असोसिएशनची सुरू आहे, त्यानंतर त्यांच्या खेळात अनेक बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT