Paris Olympic 2024 : १९५२च्या हेल्सिंकी ऑलिम्पिक स्पर्धेतून एका खेळाडूने अमेरिकेत टेलिग्राम केला... बाबा, मी जिंकलो. मी सुवर्णपदक घरी घेऊन येत आहे, जे तुम्हाला जिंकता आलं असतं, पण त्यावेळी तुम्ही कुटुंबाला प्राधान्य दिलं. लेकांचा हा संदेश हाती येताच वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि त्यांचं त्याग सार्थकी लागल्याची भावना त्यांच्या मनाला स्पर्श करून गेली.
ऑलिम्पिक स्पर्धेतील बाप-लेकाच्या ही हृदयस्पर्शी गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या आयुष्यात काही गोष्टी आहत्या हातात नसतात, अनेकदा आपण काहीतरी एक निवड, अशा पेचात सापडतोच. तो निर्णय योग्य ठरला तर त्याचे फार काही वाटत नाही, पण तोच चुकला की आयुष्यभर त्याची सल मनाला टोचत राहते. अशीच एक दुर्मिळ घटना ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात घडली आहे.
१९२४ मध्ये अमेरिकेचा Canoe संघ म्हणजे त्यावेळेस तगडा मानला जायचा... त्या टीम मधील अव्वल कॅनोइस्ट्सपैकी एक बिल हेव्हन्स ( Bill Havens) हे नाव.. १९२४ मध्ये Paris Olympic साठी त्यांची निवड झाली होती, परंतु त्यांची त्यावेळ कोंडी झाली. त्यांची पत्नी पहिल्या मुलाला जन्म देणार होती आणि तिच्यासोबत थांबायचे की ऑलिम्पिकसाठी पॅरिसला रवाना व्हायचे, अशा द्विधा मनस्थितीत बिल हेव्हन्स सापडले होते. त्यांनी यावेळी पत्नीसोबत थांबण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेचा संघ कॅनोइमध्ये गोल्ड मेडल जिंकण्याच्या शर्यतीत हॉट फेव्हरिट होता, तरीही बिल हेव्हन्सच्या निर्णयाचे सर्वांना आश्चर्य वाटले.
गोल्ड मेडल नावावर करण्याची संधी गमावल्याचे दुःख बिल हेव्हन्स यांच्या मनात नक्की आली असावी, परंतु त्याचवेळी कुटुंबाला प्राधान्य दिल्याचं समाधानही त्यांना वाटले असावे. अमेरिकेच्या कॅनोइ संघाने अपेक्षित सुवर्णपदक जिंकले. दरम्यान बिल हेव्हन्स यांच्या घरी गोड बाळ जन्माला आले. बिल व त्यांच्या पत्नीने त्या बाळाचे नाव फ्रँक असे ठेवले.
आता तुम्ही विचार करत असाल, यात नियतीची काय भूमिका... तर झालं असं की, हाच तो फ्रँक आणि त्याचा भाऊ विलियम यांनी १९४८च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत १०००० मीटर रोइंग स्पर्धेत सहभाग घेतला. त्यात फ्रँकने रौप्यपदक जिंकले, तर विलियम पाचव्या स्थानावर राहिला. पण, फ्रँक रौप्यपदकावर समाधान मानणारा नव्हता.
१९५२च्या हेल्सिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने १०००० मीटर शर्यतीत पुन्हा भाग घेतला. झेक प्रजासत्ताकचा पॅडलर अल्फ्रेड जिंद्रा हा शर्यतीत बऱ्याच टप्प्यांवर आघाडीवर होता, परंतु फ्रँकने ८ सेकंदाच्या फरकाने फिनिश लाईन पूर्ण केली आणि सुवर्णपदक नावावर केले. त्यानंतर त्याने वडिलांना भावनिक टेलिग्राम पाठवले...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.