Indian hockey team sakal
क्रीडा

India at Paris Olympic 2024 : हॉकीतील अपराजित मालिका खंडित; निखत जरीन, प्रविण जाधव पदक शर्यतीतून बाद

Swadesh Ghanekar

India at Paris Olympic 2024 Hockey Live Update : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेने ( Swapnil Kusale) याने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारताला पदक जिंकून दिले. मनु भाकर हिच्यानंतर पॅरिसमध्ये नेमबाजीत पदक जिंकणारा तो दुसरा भारतीय ठरला आणि एकाच ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत ३ पदक जिंकण्याची ही भारताची पहिलीच वेळ ठरली...

तत्पूर्वी, पुरुषांच्या २० किमी चालण्याच्या शर्यतीत भारताच्या विकास सिंग ( १:२२:३६ मि.), परमजीत सिंग बिस्त ( १:२३:४८ मि.) यांना अनुक्रमे ३० व ३७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. आकाशदीप सिंगला शर्यत पूर्ण करता आली नाही. महिलांच्या २० किमी चालण्याच्या शर्यतीत प्रियांकाला ४१ व्या स्थानावर राहिली.

हॉकीत कडवी टक्कर...

पुरूष हॉकी संघाची अपराजित मालिका खंडित झाली. तगड्या बेल्जियमला कडवी टक्कर देऊनही भारताला २-१ ने पराभव पत्करावा लागला. भारताला १८व्या मिनिटाला अभिषेकने आघाडी मिळवून दिली. पण, तिसऱ्या व चौथ्या क्वार्टरमध्ये बेल्जियमने पुनरागमन केले. ३३व्या मिनिटाला स्टॉकब्रॉक्स थिबीयू व ४४व्या मिनिटाला डोहमेन जॉन यांनी गोल करून २-१ अशी आघाडी घेतली. भारतीय संघाने शेवटपर्यंत बरोबरीचा गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, परंतु त्यांच्या वाट्याला अपयश आले. भारताचा पुढील सामना २ ऑगस्टला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे.

बॉक्सिंगमध्ये निखत जरीनला अव्वल मानांकित वू यू ( चीन) कडून ०-५ अशी हार मानावी लागल्याने पदकाच्या शर्यतीतून ती बाद झाली आहे. तेच तिरंदाजीत चीनच्या काओ वेनचाओने ६-० अशा फरकाने प्रविण जाधवचा पराभव केला. भारत ३ कांस्य पदकांसह पदकतालिकेत ४२व्या क्रमांकावर आहे. चीन, फ्रान्स आणि जपान यांनी अव्वल तीन देशांमधील स्थान टिकवले आहे. चीन ११ सुवर्ण, ७ रौप्य व १३ कांस्य अशा एकूण २१ पदकांसह अव्वल स्थानी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Amit Thackeray: अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधला; पण मुंबईतला नाही तर...

Jarange Health Update: उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांनी केल्या कडक शब्दांत सूचना

Latest Marathi News Updates : भाजपशासित सर्व राज्यांमध्ये प्रसादाची तपासणी करावी: मंत्री प्रियांक खर्गे

IND vs BAN: अ‍ॅक्शन रिप्ले! Rohit Sharma दुसऱ्या डावातही फसला; एकाच पद्धतीने पुन्हा OUT झाला, जैस्वालही गंडला

Share Market Closing: आठवड्याच्या शेवटी शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्सने 1400 अंकांनी वाढला, निफ्टी 25,800च्या वर

SCROLL FOR NEXT