India Hockey Team Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024, Hockey: भारतानं काढला वर्ल्ड कप पराभवचा वचपा! ऑलिम्पिकच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडला चारली धूळ

Pranali Kodre

Paris Olympic 2024, India vs New Zealand Hockey Match: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत शनिवारी भारतीय हॉकी संघाचा पहिला सामना न्यूझीलंड संघाविरुद्ध झाला. या सामन्यात भारतीय संघाने 3-2 अशा गोलफरकाने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने ऑलिम्पिकच्या मोहिमेचीही सुरुवात केली आहे.

या सामन्यात अखेरच्या क्षणी कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर केलेला गोल महत्त्वाचा ठरला. तत्पूर्वी या सामन्यात भारताकडून मनदीप सिंग आणि विवेक सागर प्रसाद यांनी गोल केले. तसेच न्यूझीलंडकडून सॅम लेन आणि सिमन चाईल्ड यांनी गोल केले.

दरम्यान, भारताला गेल्यावर्षी मायदेशात झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडने उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का दिला होता आणि स्पर्धेतून बाहेर केले होते. त्यामुळे तो पराभव गेल्या वर्षभरापासून भारतीय चाहत्यांना बोचत होता. पण आता भारतीय संघाने ऑलिम्पिकची सुरुवात न्यूझीलंडला पराभूत करत केली आहे.

शनिवारी न्यूझीलंडने भारताविरुद्ध चांगली सुरुवात केली होती. त्यातच आठव्याच मिनिटाला न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर सॅम लेनने फायदा घेत गोल केला आणि न्यूझीलंडला आघाडी मिळवून दिली होती.

यानंतर १० मिनिटाला भारताच्या गुरजंत सिंगला ग्रीन कार्ड मिळाल्याने २ मिनिटांसाठी मैदानातून बाहेर जावे लागले. पहिला क्वार्टर संपला, तेव्हा भारतीय संघ ०-१ अशा पिछाडीवर होता. त्यामुळे भारतावर दबाव होता.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने गोलसाठी प्रयत्न सुरू केले. २४ व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नरही मिळाला होता. परंतु, हरमनप्रीतचा शॉट न्यूझीलंडच्या बचावाने आडवला.

त्यानंतर लगेचच पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्यावर मनदीपने गोल केला. हा गोल योग्य आहे की नाही, हे देखील तपासण्यात आले. पण अखेर गोल योग्य ठरल्याने भारताने बरोबरी साधली. त्यामुळे हाफ टाईमनंतर सामना १-१ अशा बरोबरीत होता.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांकडून आक्रमक सुरुवात झाली. त्यातच ३४ व्या मिनिटाला विवेकने भारतासाठी दुसरा गोल नोंदवला. मात्र हा गोल वादग्रस्त ठरला. गोल दिल्यानंतर न्यूझीलंडने रिव्ह्यू मागितला होता. मात्र, रिव्ह्यूमध्ये काहीच स्पष्ट होत नसल्याने रेफ्रीचा निर्णय अंतिम मानण्यात आला आणि भारताने आघाडी घेतली.

३६ व्या मिनिटाला न्यूझीलंडला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोलकिपर पीआर श्रीजेशने चांगला बचाव केला. त्यानंतरही न्यूझीलंडने बरेच प्रयत्न केले, पण भारताने चांगला बचाव केला. अखेरचे क्वार्टर रोमांचक ठरले. ५३ व्या मिनिटाला न्यूझीलंडकडून सिमॉनने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत बरोबरी साधली. त्यामुळे अखेरच्या आठ मिनिटात भारतीय संघही आक्रमक दिसला.

शेवटची दोन मिनिटे राहिलेली असताना भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. आधी न्यूझीलंडच्या गोलकिपरने चांगला बचाव केला. पण शेवटच्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर हरमनप्रीत कौरने शानदार गोल केला आणि भारताने सेलीब्रेशन केले. अखेरच्या मिनिटापर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारताने विजय मिळवला.

आता भारताचा पुढील सामना अर्जेंटिनाविरुद्ध २९ जुलै रोजी होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ४.१५ वाजता चालू होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये चरबी कोण मिसळत होतं? अमित शाहांना लिहिलं पत्र

EY Pune: 'इतके मेलेले लोक, फक्त अंतिम संस्कार...', CAच्या मृत्यूनंतर अश्नीर ग्रोव्हरचा व्हिडिओ व्हायरल

NZ vs SL, Test : बॉल आला अन् कॅप्टन साऊदीने झपकन एकाच हाताने पकडला अफलातून कॅच, पाहा Video

Accident: चूक कोणाची? वेगाने Bike पळवणाऱ्या तरुणाची, की त्या SUV चालकाची.... थरार Video Viral

Latest Marathi News Updates : भाजपशासित सर्व राज्यांमध्ये प्रसादाची तपासणी करावी: मंत्री प्रियांक खर्गे

SCROLL FOR NEXT