Paris Olympic 2024 India Schedule on Day 11: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मंगळवारी ११ व्या दिवसाचे खेळ खेळवले जाणार आहेत. खरंतर भारतासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. गेल्या काही दिवसात भारताच्या खेळाडूंनी थोडक्यात मेडल्स गमावले आहेत. त्यामुळे आता उर्वरित खेळांमध्ये तरी भारताला मेडल्सच्या आशा आहेत.
त्यातच भारताची सर्वात मोठी आशा गोल्डन बॉय नीरज चोप्रावर आहे. नीरज आणि किशोर जेना सोमवारी भालाफेरीचे क्वालिफायर्स खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. नीरजसमोर यंदा त्याचं सुवर्णपदक राखण्याचा आव्हान आहे, तर भारताला नीरजबरोबरच किशोर जेनाकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.
याशिवाय सोमवारीच हॉकीची सेमीफायनलही रंगणार आहे. भारत आणि जर्मनी हे दोन संघ सेमीफायनलमध्ये आमने-सामने असणार आहेत. या सामन्यात विजय मिळवणारा संघ मेडल तर पक्कं करेलच पण त्याबरोबरच सुवर्ण पदकासाठीही खेळेल.
याशिवाय कुस्तीमध्ये आज विनेश फोगट रिंगणार उतरणार आहे. त्याचबरोबर महिलांच्या ४०० मीटरचा रेपेचेज राऊंड होईल, ज्याच किरण पहल सहभागी होणारे. टेबल टेनिसमध्येही पुरुषांच्या सांघिक प्रकारात भारताचा संघ खेळताना दिसेल. एकूणच ११ व्या दिवसाचं वेळापत्रक कसं असेल जाणून घ्या.
पुरुष सांघिक उपउपांत्यपूर्व (दुपारी १.३० वाजता) (भारत विरुद्ध चीन)
पुरुष भालाफेक
ए ग्रुप - किशोर जेना - (दुपारी १.५० वाजता)
बी ग्रुप - नीरज चोप्रा - (दुपारी ३.२० वाजता)
महिला ४०० मीटर रेपेचेज (दुपारी २.५० वाजता) (किरण पहल)
महिला फ्रिस्टाईल ६८ किलो वजनी गट रेपेचेज (दुपारी २.३० वाजता) (निशा दहिया, जर पात्र ठरली तर)
महिला फ्रिस्टाईल ६८ किलो वजनी गट कांस्य पदक (मध्यरात्री १२.२० वाजता(७ ऑगस्ट) (जर पात्र ठरली तर)
महिला फ्रिस्टाईल ५० किलो वजनी गट उपउपांत्यपूर्व फेरी (दुपारी ३.०० वाजता) (विनेश फोगट)
महिला फ्रिस्टाईल ५० किलो वजनी गट उपांत्यपूर्व फेरी (दुपारी ४.२० वाजता) (जर पात्र ठरली तर)
महिला फ्रिस्टाईल ५० किलो वजनी गट उपांत्य फेरी (रात्री १०.२५ वाजता) (जर पात्र ठरली तर)
भारत विरुद्ध जर्मनी उपांत्य फेरी (रात्री १०.३० वाजता)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.