India at Paris olympics 2024 Live Update - ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासात प्रथमच उद्घाटन सोहळा नदी तीरावर पाड पडला. पॅरिसच्या सीन नदीत १०० हून अधिक बोटींतून खेळाडूंचे संचलन केले गेले आणि २०६ देशांतून एकूण १०,७१४ स्पर्धक या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी त्यांच्या सपोर्ट स्टाफसह पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत पार पडणाऱ्या या स्पर्धेत भारताच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. भारताच्या पुरुष व महिला तिरंदाजी संघाने पात्रता फेरीत दमदार कामगिरी करून उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवला. पण, आज रोईंगमध्ये भारताच्या बलराज पनवारची ( Balraj Panwar) थेट पात्रतेची संधी थोडक्यात हुकली.
भारताचा रोईंगपटू बलराज पनवारने पुरुष एकल स्कलच्या हिटमध्ये ७ मिनिटे ०७.११ सेकंदची नोंद करताना चौथे स्थान पटकावले. पण, त्याला उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवता आला नाही. इजिप्तचा अब्देलखालेक एलबानिया ( ७:०५.०६) तिसरा आल्याने बलराजची संधी थोडक्यात हुकली. आता त्याला उद्या होणाऱ्या रेपेजेच राऊंडमधून आगेकूच करण्याची आणखी एक संधी आहे.
बलराजने चार वर्षांपूर्वीच रोईंगला सुरुवात केली आणि पॅरिसमध्ये सहभागी होणारा तो एकमेव भारतीय रोईंगपटू आहे. आशियाई स्पर्धेत थोडक्यासाठी त्याचे कांस्यपदक हुकले होते आणि यावर्षाच्या सुरुवातीला झालेल्या आशियाई व ओशियानीक रोईंग ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत कांस्य जिंकून त्याने पॅरिसचे तिकीट पटकावले होते.
२५ वर्षीय बलराज सैन्यदलात कार्यरत आहे आणि तो हरयाणाच्या कैमला येथून आहे त्याला बजरंग लाल ठक्कर हे मार्गदर्शन करतात. २००८ मध्ये त्यांनी याच क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले होते..
दरम्यान, २५ जुलैला भारतीय महिला तिरंदाजी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत चांगली कामगिरी केली. अंकिता भकत ( Ankita Bhakat), भजन कौर आणि दीपिका कुमारी ( Deepika Kumari) यांनी भारतीय महिला संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवून दिला. महिला संघापाठोपाठ पुरूष संघानेही उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला.पुरुष तिरंदाजांमध्ये तरुणदीप राय, महाराष्ट्राचा प्रविण जाधव ( Pravin Jadhav) आणि धिरज बोम्मादेवरा यांनी चांगली कामगिरी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.