paris olympic 2024 italian boxing federation rejects prize money from banned iba marathi news  sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : आयबीएच्या बक्षिसास नकार; इटालियन बॉक्सिंग महासंघाचा ऑलिंपिक महिला लिंग वाद प्रकरणी निर्णय

पॅरिस ऑलिंपिक महिला बॉक्सिंग लिंग वाद प्रकरणी सहानुभूती व्यक्त करताना बंदी असलेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने (आयबीए) जाहीर केलेले रोख रकमेचे बक्षीस स्वीकारण्यास इटलियन बॉक्सिंग महासंघाने नकार दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस : पॅरिस ऑलिंपिक महिला बॉक्सिंग लिंग वाद प्रकरणी सहानुभूती व्यक्त करताना बंदी असलेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने (आयबीए) जाहीर केलेले रोख रकमेचे बक्षीस स्वीकारण्यास इटलियन बॉक्सिंग महासंघाने नकार दिला आहे.

अल्जेरियाच्या इमाने खलिफ हिच्याविरुद्ध फक्त ४६ सेकंदात रडत लढत सोडलेली अँजेला कारिनी हिला ५०,००० डॉलर्सचे बक्षीस आपली संघटना देऊ इच्छिते, असे आयबीए अध्यक्ष उमर क्रेमलेव यांनी जाहीर केले होते. शिवाय त्यांनी इटलीच्या राष्ट्रीय महासंघाला आणि कारिनीच्या प्रशिक्षकास प्रत्येकी २५,००० डॉलर्सचा पुरस्कार देण्याचा हेतू असल्याचे सांगितले होते.

क्रेमलेव यांच्या ऑफरसंदर्भात इटालियन बॉक्सिंग महासंघाने एक निवेदन प्रसिद्धीला देत, कोणत्याही प्रकारचे रोख पारितोषिक स्वीकारण्याबाबतच्या काही माध्यमांतील वृत्त नाकारले. कारिनी किंवा तिचा प्रशिक्षक यांचे रोख रक्कम स्वीकारण्याबाबत नियोजन आहे का याबाबत इटालियन महासंघाने स्पष्ट केलेले नाही.

इटालियन बॉक्सिंग महासंघ आयबीए किंवा प्रमुख पश्चिमी हौशी बॉक्सिंग महासंघाचे सदस्य नाही. बॉक्सिंगमधील नवी नियमन संस्था वर्ल्ड बॉक्सिंगच्या स्थापनेत गेल्या दोन वर्षांत सुमारे तीन डझन महासंघांनी आयबीए सोडलेली आहे. पुढील ऑलिंपिकमध्ये वर्ल्ड बॉक्सिंगला बंदी असलेल्या आयबीएचे स्थान मिळण्याचे संकेत आहेत.

टोकियो ऑलिंपिकपूर्वी आंतरराष्ट्रीय ऑलिपिक कमिटीने (आयओसी) आयबीएला निलंबित केले होते. त्यानंतर गतवर्षी पूर्णपणे बंदी लादली. लिंग वाद प्रकरणी क्रेमलेव यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक कमिटीवर सलगपणे जहाल टीका केली आहे.

आयबीएच्या दाव्यानुसार, गतवर्षीच्या जागतिक स्पर्धेत खलिफ लिंग पात्रता चाचणीत अपयशी ठरली होती. पॅरिस ऑलिंपिकमधील महिला बॉक्सिंगमध्ये खलिफ आणि तैवानची लिन यू-टिंग यांच्या सहभागावरून जगभरातून टीका झालेली आहे. खलिफ व लिन यांनी ऑलिंपिक पात्रतेसाठी आवश्यक निकष पूर्ण केल्याचे आयओसीने सातत्याने सांगितले आहे. नवी दिल्लीत गतवर्षी अपात्र घोषित करण्यापूर्वी दोन्ही बॉक्सर आयबीएच्या स्पर्धांत कित्येक वर्षे भाग घेत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT