Manu Bhaker sakal
क्रीडा

India at Paris Olympics 2024 Live - ''कृपया माझ्यावर रागवू नका!'' भारतीयांना असं का म्हणतेय मनु भाकर?

Swadesh Ghanekar

Manu Bhaker Coach in Paris Olympic 2024 - पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची २२ वर्षीय नेमबाज मनु भाकर हिने ऐतिहासिक कामगिरी केली. मनु भाकरने १० मीटर एअर पिस्तुल वैयक्तिक आणि १० मीटर एअर पिस्तुल मिश्र गटात ( सरबजोत सिंग) अशी दोन कांस्यपदकं नावावर केली. स्वातंत्र्य भारतानंतर एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी मनु ही पहिली भारतीय खेळाडू आहे. या दोन पदकानंतर मनुने आनंद व्यक्त केला, परंतु त्याचवेळी तिने भारतीयांना ''माझ्यावर रागवू नका'', असं आवाहन करावं लागलं.

मनु भाकर आणि सरबजोत सिंग यांनी १० मीटर एअर पिस्तुल मिश्र गटाच्या कांस्यपदकाच्या लढतीत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंवर १६-१० असे पराभूत केले. सुशील कुमार ( कुस्ती) व पी व्ही सिंधू ( बॅडमिंटन ) यांच्यानंतर दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनु भाकर ही तिसरी भारतीय खेळाडू ठरली. पण, सुशील व सिंधू यांनी दोन वेगवेगळ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकले आहेत. मनुने एकाच ऑलिम्पिकमध्ये हा पराक्रम केला.

१९०० मध्ये नॉर्मन प्रिचर्ड यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना मैदानी स्पर्धेत दोन रौप्यपदकं जिंकली होती. पण, ही पदकं भारताची की ग्रेट ब्रिटनची असा वाद वर्षानुवर्षे सुरू आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतर भारताला एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकून देणारी मनु ही पहिलीच खेळाडू ठरली. आता तिला आणखी एक पदक जिंकण्याची संधी आहे. मनु २५ मीटर पिस्तुल गटात सहभाग घेणार आहे आणि २ ऑगस्टला याची पात्रता फेरी पार पडणार आहे.

दरम्यान, आज कांस्यपदक जिंकल्यानंतर मनु भाकर म्हणाली, मला खूप अभिमान वाटतोय... मी ही ऐतिहासिक कामगिरी करू शकले, याचा आनंद आहे. हे सर्व तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद अन् प्रेमाशिवाय शक्य झालं नसतं. आणखी एक गटात खेळायचे आहे, पण त्यात जिंकले नाही तर कृपया माझ्यावर रागवू नका...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

Pitru Paksha 2024 : रक्षाविसर्जन, पिंडदान, पितृशांतीसाठी यमराजांनी कावळ्यालाच का दिला बहुमान?

Vivek Oberoi : "माझं पहिलं प्रेम कॅन्सरमुळे गमावलं" ; पूर्वायुष्यावर भरभरून बोलला विवेक, म्हणाला- "मी कधीच धोका..."

SCROLL FOR NEXT