Most Olympic Medals winner Players for India sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : मेजर ध्यानचंद नव्हे तर भारताला 'या' दोघांनी ऑलिम्पिकमध्ये जिंकून दिलीत सर्वाधिक पदकं!

Swadesh Ghanekar

Paris Olympic 2024, Most Olympic Medals for India : पॅरिसमध्ये पार पडणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत ११७ जणांचा भारतीय चमू पदक जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. भारताला ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत ३५ पदकंच जिंकता आलेली आहेत आणि त्यापैकी १२ पदकं ही सांघिक प्रकारातील आहेत. भारताच्या एकूण २२२ खेळाडूंना पदकं दिली गेली आहेत. भारताच्या पुरुष हॉकी संघाने १९२८ ते १९३६ आणि १९४८ ते १९६४ हा काळ गाजवला. वैयक्तिक खेळात एकापेक्षा जास्त पदक जिंकणारे भारतीय फार कमी आहेत.

३७ भारतीयांनी आतापर्यंत एकापेक्षा अधिक ( एकूण ८८ पदकं) पदकं जिंकली आहेत, शिवाय १३४ जणं अशी आहेत की ज्यांना एकच पदक जिंकता आलेलं आहे. आतापर्यंत १७१ भारतीय खेळाडूंना प्रत्यक्ष ऑलिम्पिक पदकाला हात लावता आलेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया भारताला एकापेक्षा अधिक पदकं जिंकून देणारे ऑलिम्पियन.

नीरज चोप्रा, लव्हलिना बोर्गोहेन, मीराबाई चानू, पी आर श्रीजेश, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, सुमित वाल्मिकी, शमशेर सिंग, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंग, गुरजंत सिंग यांनी प्रत्येकी १ पदक जिंकले आहे आणि पॅरिसमध्ये हे पदकाची संख्या दोन करू शकतात.

neeraj chopra paris olympic 2024
  • नॉर्मन पिचर्ड - २०० मीटर शर्यत आणि अडथळ्यांची स्पर्धा, १९०० - दोन रौप्य

  • सुशिल कुमार ( कुस्ती) - २००८ कांस्य व २०१२ रौप्य

  • पी व्ही सिंधू ( बॅडमिंटन ) - २०१६ रौप्य, २०२० कांस्य

नॉर्मन प्रिचर्ड हे भारताचा पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे खेळाडू आहेत आणि त्यांनी पॅरिसमध्ये २ पदकं मिळविली होती. त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले की नाही, यावरून वाद सुरू आहे, परंतु आयओसीच्या नोंदीनुसार ते ब्रिटिश भारतासाठी खेळले होते. सुशील कुमारने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकासह कुस्ती पदकासाठी भारताची ५६ वर्षांची प्रतीक्षा संपवली होती. पी व्ही सिंधू ही ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे आणि पॅरिसमध्ये तिला तिसरं पदक पटकावण्याची संधी आहे. असं झाल्यास ती भारताकडून तीन वैयक्तिक पदकं जिंकणारी पहिली खेळाडू ठरेल.

कॅर्लीइल टॅपसेल, रूप सिंग, जसवंत राय, गोविंद पेरुमल, अमीर कुमार, जसवंत सिंग राजपूत, लेस्ली हॅमंड, ब्रूम पिनिगर, सय्यद जाफर, केशव दत्त, ग्रहनंदन सिंग, केडी सिंग, रघबीर लाल, जोगिंदर सिंग, चरणजीत सिंग, रघबीर सिंग भोला, मोहिंदर लाल, बालकृष्ण सिंग, राजेंद्रन क्रिस्टी, बलबीर सिंग कुल्लर, जगजीत सिंग, गुरबक्स सिंग, कृष्णमूर्ती पेरुमल, अजितपाल सिंग, हार्मिक सिंग हे भारताकडून दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारे अन्य पुरुष हॉकीपटू आहेत.

  • बलबिर सिंग सीनियर ( हॉकी - १९४८ सुवर्ण, १९५२ सुवर्ण, १९५६ सुवर्ण

  • रंगनाथन फ्रँसिस ( हॉकी) - १९४८ सुवर्ण, १९५२ सुवर्ण, १९५६ सुवर्ण

  • रंधीर सिंग जेंटल ( हकी) - १९४८ सुवर्ण, १९५२ सुवर्ण, १९५६ सुवर्ण

बलबीर सिंग सीनियर हे सर्वोत्कृष्ट सेंटर-फॉरवर्ड म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी ६१ सामन्यांत २४६ गोल्स करण्याचा विक्रम केला आहे. या फॉरवर्डने दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला सलग तीन सुवर्णपद जिंकून दिली. त्यांनी ३ ऑलिम्पिकमध्ये ८ सामन्यांत २२ गोल्स केले. ऑलिम्पिक फायनलमध्ये सर्वाधिक ५ गोल्स करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

शंकर लक्ष्मण ( २ सुवर्ण, १ रौप्य ), हरिपाल कौशिक ( २ सुवर्ण, १ रौप्य), जॉन पीटर ( १ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य ), पृथ्वीपाल सिंग ( १ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य ), हरबिंदर सिंग ( १ सुवर्ण व २ कांस्य ) हे तीन ऑलिम्पिक पदके जिंकणारे इतर भारतीय आहेत.

post-War Olympic gold hockey team, in Melbourne in 1956
  • ध्यान चंद ( हॉकी ) - १९२८ सुवर्ण, १९३२ सुवर्ण , १९३६ सुवर्ण

  • रिचर्ड जेम्स अॅलन ( हॉकी) - १९२८ सुवर्ण, १९३२ सुवर्ण, १९३६ सुवर्ण

ध्यान चंद हे भारताचे सर्वोत्तम हॉकीपटू होते आणि रिचर्ड यांच्यासह तीन सलग ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारे ते पहिले खेळाडू होते. ध्यान चंद यांनी मिळवलेल्या लौकिकापाशी कोणत्याही खेळाडूला पोहोचता येणार नाही. त्यांना हॉकीचा जादूगार म्हटले जाते, कारण त्यांच्या हॉकी स्टीकला जणू चेंडू चिकटून राहायचा आणि अगदी सहजतेनं ते गोल करून जायचे. तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्यांनी १२ सामन्यांत ३३ गोल्स केले आहेत.

major dhyan chand
  • उधम सिंग ( हॉकी) - १९५२ सुवर्ण, १९५६ सुवर्ण, १९६० रौप्य व १९६४ सुवर्ण

  • लेस्ली क्लाऊडिअस ( हॉकी)- १९४८ सुवर्ण, १९५२ सुवर्ण, १९५६ सुवर्ण, १९६० रौप्य

भारतासाठी सर्वाधिक ४ पदकं जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये उधम सिंग व लेस्ली क्लाऊडिअस ही दोन नावं आहेत. या दोघांनी हॉकीमध्ये हे वैभव प्राप्त केले आहे. उधम सिंग यांनी प्रशिक्षक म्हणूनही एक पदक नावावर केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलेल्या भारतीय संघाने १९६९मध्ये कांस्यपदक जिंकले. १९४८ साली बोटाला झालेल्या दुखापतीमुळे त्यांना ऑलिम्पिकमध्ये जाता नाही आले अन्यथा त्यांच्या नावावर आणखी एक गोल्ड दिसले असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT