Paris Olympic 2024 Nigeria women basketball team sakal
क्रीडा

Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात गोंधळ! 'या' खेळाडूंना परेडमध्ये मिळाली नाही एन्ट्री...

Kiran Mahanavar

Paris Olympic 2024 : प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेचे शानदार उद्‌घाटन झाले. या समारंभाच्या काही तास अगोदर हायस्पिड रेल्वे नेटवर्कवर हल्ला करून दहशतवादाचा इशारा देण्यात आला होता; परंतु त्याचा उद्‌घाटन सोहळ्यावर काहीच परिणाम झाला नाही.

खुल्या आसमंतात झालेला हा उद्‌घाटन सोहळा ऑलिंपिकच्या इतिहासातील ऐतिहासिक ठरला. सीन नदीच्या तीरावर झालेला हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा होता. ढगाळलेले आकाश आणि पावसाच्या हलक्या सरी पडत असल्या तरी सोहळ्याचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता.

फुटबॉल सुपरस्टार झिनेदिन झिदान क्रीडाज्योत मेट्रोतून घेऊन आला आणि तेथूनच सोहळ्यातील ज्योतीचा प्रवास सुरू झाला. ८५ बोटींतून १० हजारांहून अधिक खेळाडू त्यांच्या त्यांच्या देशांचे प्रतिनिधीत्व करत होते. त्या सर्वांसाठी हा अभूतपूर्व अनुभव होता. पण यावेळी काही खेळाडूंना बोटीत बसण्यापासूनही रोखण्यात आले.

परेडमध्ये ग्रीक संघ प्रथम आला, कारण या देशात ऑलिम्पिक खेळला सुरू झाली होती. त्याच वेळी, फ्रान्स यजमान असल्यामुळे शेवटी आला. पण यावेळीत नायजेरियन संघ चर्चेत राहिला. अहवालानुसार, पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभासाठी नायजेरियन महिला बास्केटबॉल संघाला डेलिगेशन बोटमध्ये बसण्याची परवानगी नव्हती.

वृत्तानुसार, नायजेरियन महिला बास्केटबॉल संघाला नायजेरियन अधिकाऱ्यांनी बोटीत चढण्यापासून रोखले होते. पण आता यामागचे कारणही समोर आले आहे. खरंतर, बोटीवर खूप खेळाडू असल्यामुळे नायजेरियन महिला बास्केटबॉल संघ आणि त्यांच्या प्रशिक्षकाला बोटीवर एन्ट्री मिळाली नाही.

आत्तापर्यंत ऑलिंपिकचे उद्‌घाटन सोहळे बंदिस्त स्टेडियममध्ये झाले होते, पण पॅरिसमधील या सोहळ्याला कोणत्याही मर्यादा नव्हत्या. अख्खा आसमंत जणू त्यांनी व्यापला असल्याचे जाणवत होते. बोटीतून खेळाडूंच्या संचलनाची सुरुवात अर्थात पहिलेवहिले ऑलिंपिक झालेल्या ग्रीस देशाच्या खेळाडूंकडून झाले. खेळाडूंच्या संख्येनुसार बोटींचे आकार होते. त्यामुळे काही बोटी तर फार मोठ्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान

IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद पाडू म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीचे जोरदार आंदोलन

IT Act Amendment: मुंबई हायकोर्टाचा केंद्र सरकारला दणका! IT कायद्यातील घटनादुरुस्ती रद्द करण्याचे आदेश; युट्यूब, फेसबुक, ट्विटरला दिलासा

Latest Marathi News Live Updates: नानासाहेब परुळेकरांच्या जयंतीनिमित्त नितीन गडकरींचं भाषण

SCROLL FOR NEXT