Nita Ambani | Paris Olympic 2024 Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024: ऑलम्पिक 2036 यजमानपदासाठीच्या शर्यतीत भारताची पाठराखण करणाऱ्या नीता अंबानी

House Of India Paris Olympic 2024: नीता अंबानी अध्यक्ष असलेल्या रिलायन्स फाऊंडेशनने पॅरिसमधील ला व्हित्ते येथे उभारण्यात आलेल्या हाऊस ऑफ इंडिया हाऊसला आर्थिक प्रायोजकत्तव दिलं आहे.

सकाळ वृत्तसेवा

Paris Olympic 2024

अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांची इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीमध्ये पुर्ननियुक्ती झाली. त्यानी पोर्ट दे ला व्हिट्टे येथे हे स्वागत स्वीकारले. आशियातील एक महत्त्वाची व्यक्ती असलेल्या अंबानी खेळातील सॉफ्ट पॉवरवर आता भिस्त ठेऊन आहेत.

गेल्या काही आठवड्यात जगभरातील प्रसारमाध्यमांत नीता अंबानी या सातत्याने झळकत होत्या. नुकतेच त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा अत्यंत शानदार लग्नसोहळा पार पडला. चार महिने हा सोहळा सुरु होता. जस्टीन बिबर, रिहाना, टोनी ब्लेअर, बोरिस जॉन्सन यांच्यापासून ते बॉलिवूड सिताऱ्यांपर्यंत अनेक सेलिब्रिटीजना या लग्नाला हजेरी लावली होती. या लग्नाचा खर्च जवळपास ५००दशलक्ष युरोज इतका झाल्याची चर्चा आहे. भारतातील अत्यंत प्रतिष्ठीत असे अब्जाधीश आणि रिलायन्स उद्योगसमूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या पत्नी असलेल्या नीता सध्या ऑलिम्पिक पंधरवड्यासाठी पॅरिस इथे तळ ठोकून आहेत.

जागतिक ऑलिम्पिक संघटनेच्या त्या २०१६ पासून सदस्या आहेत आणि नुकतीच त्यांची पुर्ननियुक्तीही झाली आहे. नीता अंबानी अध्यक्ष असलेल्या रिलायन्स फाऊंडेशनने पॅरिसमधील ला व्हित्ते येथे उभारण्यात आलेल्या हाऊस ऑफ इंडिया हाऊसला आर्थिक प्रायोजकत्तव दिलं आहे.

भारतीय हस्तकला, संगीत, खाद्यपदार्थ आणि खेळांच्या या प्रदर्शनामध्ये नीता अंबानी सहभागी झाल्या होत्या. त्यांनी गुलाबी रंगछटेची फुलांची प्रिंट असलेली साडी नेसली होती. भरतनाट्यम नृत्यांगना असणाऱ्या शिवाय अर्थशास्त्रात पदवी मिळवलेल्या नीता ले फिगारोला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, मी २००४अथेन्सपासून कोणताही ऑलम्पिक सोहळा चुकवलेला नाही. शुक्रवारी संध्याकाळच्या समारंभात पोंचो घालून आपले पती आणि भारतीय ऑलम्पिक समितीतल्या दोस्तांबरोबर सहभागी होताना जणू पुन्हा टीनएजर झाल्यासारखं वाटलं, मत त्यांनी खळखळून हसत व्यक्त केलं.

"खेळाडूंना होडीतून मिरवणुकीची सफर खूप आवडली. लेडी गागाला फ्रेंचमध्ये गाताना ऐकणं, आनंददायी होतं तर सेलीन डियोनंचं गाणं म्हणजे जणू दुधात साखरच," असे त्या म्हणाल्या. थॉमस जॉलीच्या शोमुळे भारतातील समारंभाला प्रेरणा मिळू शकेल का, या प्रश्नाला सफाईने बगल देताना त्या म्हणाल्या, आम्ही भारतीय संस्कृती ठळकपणे दाखवू इच्छितो.

भारताला ऑलिम्पिक बाबतीत मोठ्या महत्त्वाकांक्षा आहेत. कतारच्या नेत्यांप्रमाणे आणि इतर उदयोन्मुख राष्ट्रांप्रमाणे नरेंद्र मोदीसुद्धा खेळांतील सॉफ्ट पॉवरला समजून घेत आहेत. गुजरातची राजधानी आणि अंबानी कुटुंबियांचे मूळ गाव असलेल्या अहमदाबादमध्ये २०३६चे ऑलम्पिक होणार का, हे अजून नक्की झालेली नाही. मात्र सलग तिसऱ्या निवडून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३६च्या यजमानपदाच्या शर्यतीत सहभागी व्हायला आवडेल, असं सांगितल्याचं अंबानी म्हणाल्या.

सध्या, जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला आणि १.४ अब्जाहून अधिक लोकसंख्येचा हा देश अजूनही ऑलिम्पिकमधला दिग्गज नाही. पॅरिस २०२४ मध्ये १६ प्रकारांमध्ये ११७ खेळाडूंना खेळवत आहे. भारताने २५ समर ऑलिम्पियाडमध्ये १० सुवर्णपदके मिळवली आहेत. प्रतिस्पर्धी असलेल्या फ्रान्सने २२०पेक्षा जास्त तर चीनने २६०पेक्षा जास्त पदकांची कमाई केली आहे. नीता अंबानी यांच्या अध्यक्षतेखाली रिलायन्स फाऊंडेशनने अनेक राष्ट्रीय विजेत्यांना पाठिंबा दिला आहे.

यात समावेश आहे त्या ज्योती याराजी यांचे. १०० मीटर धावण्याच्या अडथळा शर्यतीत ज्योतीने १३ सेकंदांचं टायमिंग दिलेलं आहे. असं करणारी ती पहिली भारतीय महिला आहे. नीता अंबानी तिच्याबद्दल म्हणतात, तिची आई सेविका आहे, तर वडील सुरक्षारक्षक. आमची अडथळ्यांच्या शर्यतीची राणी हे भारतातील आशादायी तरुणाईचं चित्र आहे.

गेल्या चार ते पाच वर्षांत, पंतप्रधान मोदी यांच्यामुळे देशाची पायाभूत सुविधा खूप सुधारली आहे. आज, भारतातील गावातून शहरात पोहोचणे आणि क्रीडा सुविधा मिळवणेही सोपे झाले आहे.

ज्योती याराजीने रिलायन्स फाऊंडेशनच्या तीन क्रीडा सुविधांपैकी एक असलेल्या हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. ही संस्था देशभरातील २२ दशलक्षाहून अधिक तरुणांच्या शैक्षणिक आणि क्रीडा प्रशिक्षणाची प्रायोजक आहे. नीता म्हणतात, " आता आम्ही विविध खेळांचा देश बनत आहोत," त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक मिळवलेल्या नीरज चोप्राचाही उल्लेख केला. ज्यांना त्यावेळी ६० दशलक्ष देशबांधवांनी पडद्यावर पाहिले. क्रिकेट हा देशाचा राष्ट्रीय खेळ खरंतर धर्मच आहे. आणि प्रीमियर लीग क्लब मुंबई इंडियन्सच्या नीता अंबानी मालक आहेत. रिलायन्स ग्रुपकडे जगभरात पाच क्लब आहेत. २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे क्रिकेट ऑलम्पिकमध्ये पदार्पण करेल, भारतासाठी ही सुवर्णसंधी आहे.

२०३६ ऑलिम्पियाडवर दावा करण्यासाठी मुख्य संपत्ती कोणती?

याला उत्तर देताना नीता अंबानी १.४ अब्ज भारतीयांच्या अत्यंत तरुण लोकसंख्येवर भिस्त ठेवतात. दर तीन भारतीय व्यक्तींपैकी दोन व्यक्ती या ३५ वर्षांखालील आहेत. "गेल्या चार ते पाच वर्षांत पंतप्रधान मोदींमुळे देशाची पायाभूत सुविधा लक्षणीय सुधारली आहे," यापूर्वी भारतात प्रवास करणे, खूप कठीण होते. तरुणांसाठी शहरातील प्रशिक्षण केंद्रात सहभागी होणे ही एक कसोटीच असायची. पण आता हे अधिक सोपे झाले आहे. आज, एका गावातून शहरात पोहोचणे खूप सोपे झाले आहे आणि क्रीडा सुविधांची संख्या वाढली आहे.

युरोपपेक्षाही अधिक विविधता असलेल्या या देशात धार्मिक आणि सामाजिक दरी ओलांडली जाते तिथे खेळ हे एकतेचे प्रतीक असू शकतं. जेव्हा मुलं मैदानात असतात तेव्हा सर्व भेद विसरले जातात. जगाला आज याचीच गरज आहे, असे मत नीता अंबानी यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT