South Korea's Lim Sihyeon World Record Archery  sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : २१ वर्षीय तरूणीचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारताच्या पदाकाच्या मार्गात तिचाच अडथळा

Swadesh Ghanekar

Paris Olympic 2024 World Record : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील महिला तिरंदाची पात्रता फेरीत आज विश्वविक्रम झालेला पाहायला मिळाला. दक्षिण कोरियाच्या लिम सिहॉन ( Lim Sihyeon) हीने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. २१ वर्षीय तिरंदाजपटूने ७२० पैकी ६९४ गुणांची कमाई केली आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. वैयक्तिक कामगिरीत कोरियन तिरंदाजांची वर्चस्व पाहायला मिळाले.

२१ वर्षीय लिम सिहॉनने १२ फेरी अखेरीस ६९४ गुण कमावले. यापूर्वी २०१९मध्ये कोरियाच्याच चाएयंग कँगने ६९२ गुणांची कमाई करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता. तो आज लिम सिहॉनच्या नावावर झाला. लिमने २१ वेळा १०s लक्ष्याचा वेध घेतला आणि अव्वल स्थानासह वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. लिमसह कोरियाच्या नाम सुहॉनने ६८८ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आणि जिओन हुनयंग ६६४ गुणांसह १३व्या क्रमांकावर राहिली. कोरियन संघाने सांघिक गटात एकूण २०४६ गुण मिळवून नवा ऑलिम्पिक रेकॉर्ड नोंदवला. चीन १९९६ गुणांसह दुसऱ्या, तर मेक्सिको १९८६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले. भारतीय तिरंदाज १९८३ गुणांसह चौथ्या क्रमांकासह थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले. भारताला उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा सामना करावा लागू शकतो, तेव्हा लिम ही आपल्या पदकाच्या मार्गातील अडथळा ठरू शकते.

Lim Sihyeon First world record at Paris 2024

कोण आहे लिम सिहॉन?

माझ्या बहिणीसोबत मला अव्वल स्थान पटकावयचे आहे आणि देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे. अव्वल स्पर्धांमध्ये देशाच्या संघासाठी पदक जिंकण्याचे माझे ध्येय आहे, असे मत लिम सिहॉनने स्पर्धेत येण्यापूर्वी व्यक्त केले होते. वैयक्तिक यशापेक्षा सांघिक यश महत्त्वाचे असल्याचे तिचे मत आहे.

Lim Sihyeon First world record at Paris 2024

लिम सिहॉनने सेऊल येथील कोरिया नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीतून Physical Education चे शिक्षण पूर्ण केले आहे. १३ जून २००३ सालचा तिचा जन्म आहे. २०२३च्या वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पणातच तिने वैयक्तिक, सांघिक ( एन सॅन व चोई मिसून यांच्यासह) व मिश्र सांघिक गटात ( किम वूजिनसह) सुवर्णपदक नावावर केले होते. त्याचवर्षी कोरियन स्पोर्ट्स काऊन्सिलकडून तिला सन्मानित करण्यात आले. एकाच स्पर्धेत तीन सुवर्णपदक जिंकणारी ती १९८६ नंतरची पहिली कोरियन तिरंदाज ठरली. १९८६ मध्ये यांग चँगहून व पार्क जंगह यांनी हा पराक्रम केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबचा रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT