paris Olympic 2024 to keep engage audience put up museums showcasing history and future Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : इतिहास आणि भविष्य दाखवणारे ऑलिंपिक संग्रहालये

पॅरिस शहरात ऑलिंपिकचा माहौल सतत जाणवत राहावा आणि सगळ्यांना सतत काही ना काही मिळावं याची खबरदारी प्रशासनानं घेतली आहे.

सकाळ वृत्तसेवा

- रोहिणी गोसावी

पॅरिस शहरात ऑलिंपिकचा माहौल सतत जाणवत राहावा आणि सगळ्यांना सतत काही ना काही मिळावं याची खबरदारी प्रशासनानं घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून पॅरिसमध्ये ऑलिंपिकसाठी वेगवेगळ्या विषयांवर म्युझियम्स सुरू केले आहेत.

ऑलिंपिक म्यझियम यापैकी एक आहे. ऑलिंपिकचा इतिहास आणि भविष्य दाखवणारे हे म्युझियम स्थानिक क्रीडाप्रेमी आणि पर्यटकांच्या आक्रषणाचं केंद्र ठरत आहे. पॅरिसच्या लक्झनबर्ग गार्डनमध्ये युरोपातील पहिले आर्ट्स म्युझियम अशी ओळख असलेल्या ‘लक्झनबर्ग म्युझियम’मध्ये हे तात्पुरते संग्रहालय तयार करण्यात आलेय. ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक संपेपर्यंत हे संग्रहालय बघता येणार आहे.

ऑलिपिक रिंग्जचं मूळ रेखाचित्र

या संग्रहालयाचं सगळ्यात मोठं आकर्षण आहे ते म्हणजे ऑलिंपिक रिंग्जचं मूळ रेखाचित्र! १९१३ मध्ये आधुनिक ऑलिंपिकचा जनक पियेर द कोबेर्ता यांनी हे रोखाचित्र काढलं होतं आणि त्यानंतर ते ऑलिंपिकचं बोधचिन्ह म्हणून प्रचलित झालं. तिथेच ऑलिंपिक स्पर्धांमधील पहिल्या स्टेडियमचा छोटा साचाही तयार करून ठेवण्यात आलाय.

ऑलिंपिक आणि एकूणच क्रीडा क्षेत्रात कालानुरूप काय काय बदल झालेत हे सगळे बदल या संग्रहालयात बघायला मिळतात. ऑलिंपिक स्पर्धांच्या दरम्यान शोध लागलेले कपडे, शूज, अशा अनेक गोष्टी इथे ठेवण्यात आल्यात आणि तेव्हापासून आतापर्यंत या सगळ्या गोष्टी किती बदलल्यात याचा अंदाज येऊ शकतो.

एआयचं क्रीडा क्षेत्रातलं भविष्य

इतिहासासोबतच क्रीडा जगतात भविष्यात काय बदल घडणारेत याचीही झलक इथं पाहायला मिळते. एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटिलिजेन्सचा वापर करून खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेलं एक हेल्थ क्लब इथं आहे. ज्यात खेळाडू त्यांचा फिटनेस तपासू शकतात, त्यानुसार त्यांचा व्यायाम आणि डाएट ते ॲप त्यांना ठरवून देऊ शकतं. म्हणजेच एका परीने प्रशिक्षक आणि फिटनेस ट्रेनरचं काम एक ॲप करू शकतं.

दृष्टिहीन खेळाडूंसाठीही एआयनं गोष्टी अतिशय सोप्या करून दिल्याचं इथे आल्यावर आपल्याला समजतं. दृष्टिहिन, अपंग आणि इतर व्यंग असलेल्या खेळाडूंनाही त्यांची कर्तबगारी दाखवता यावी, त्यात सहजता यावी, यासाठी तयार केलेली अनेक उपकरणं या संग्रहालयात पाहायला मिळतात.

यात छोटीशी जागा घेतलीये ती अफगाणीस्तानातल्या एका फोटोग्राफरच्या छोट्याशा फोटो प्रदर्शनाने. अफगाण महिला खेळाडूंचे बुरखा घालून खेळतानाचे, सराव करतानाचे फोटो इथं लावण्यात आलेत. नखशिखांत बुरख्यात राहूनही स्वत:चं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या खेळाडू सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात.

‘स्पोर्टस् २४’ संग्रहालय

आयफेल टॉवरच्या बाजूला ‘स्पोर्टस् २४’ क्रीडा आणि शहरी संस्कृतीवरील ऑलिंपिक प्रदर्शन नावाने तात्पुरते संग्रहालय बनवण्यात आले आहे. जे डिसेंबर २०२४ पर्यंत सुरू असेल. ऑलिंपिकसाठी आयफेल टॉवर आणि प्लास द कॉंकोर्ड या स्टेडियमवर होत असलेल्या स्केटबोर्ट, फ्रीस्टाईल, बास्केटबॉल,

सर्फिंग आणि ब्रेकींग अशा खेळांशी संबंधित असलेले ऐतिहासिक कलाकृती ठेवण्यात आल्यात. या संग्रहालयांमधले ॲथलेटिक यंत्रमानव, कार शर्यतीमधली पहिली रेसिंग कार, पहिल्या ऑलिंपिकमधील थाळी फेक खेळाडूचा पुतळा अशा अनेक गोष्टी म्हणजे क्रीडाप्रेमींसाठीची मेजवानी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT