paris olympics 2024 lin yu ting secures taiwan's third boxing medal gender controversy sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : लिंग वादाच्या पार्श्वभूमीवर लिनचे पदक निश्चित

Paris Olympic 2024 boxing match |पॅरिस ऑलिंपिकमधील महिला बॉक्सिंगमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस : ऑलिंपिक महिला बॉक्सिंगमध्ये लिंग वादात केंद्रस्थानी असलेल्या दोन बॉक्सरपैकी एक तैवानची लिन यू-टिंग हिने पदक निश्चित केले. महिलांच्या फिदरवेट गटात लिन हिने उपांत्य फेरी गाठली.

तैवानच्या २८ वर्षीय बॉक्सरने एकमताने झालेल्या निर्णयावर बल्गेरियन स्वेतलाना स्टॅनेवा हिला हरविले. प्रत्यक्षात ३४ वर्षीय स्टॅनेवा हताश दिसत होती व आपल्या बोटांनी क्रॉस चिन्ह बनवून नाही, नाही असे ओरडत रिंगणातून निघून गेली.

लढतीच्या कालावधीत स्टॅनेवा हिने सातत्याने लिन हिच्या एल्बो वापरावरून तक्रार केली. या लढतीपूर्वी, लिनच्या सहभागाला कडाडून विरोध असल्याचे बल्गेरियन बॉक्सिंग महासंघाने नमूद केले होते.

लिंग पात्रतेबाबत वाद असताना पॅरिस ऑलिंपिकमध्ये अल्जेरियाच्या इमाने खलिफ हिच्यासह लिनसुद्धा सहभागी झाली आहे. गतवर्षीच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिच्यावर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने (आयबीए) बंदी घातली होती. वृत्तानुसार, जागतिक स्पर्धेत हे बॉक्सर्स लिंग पात्रता चाचण्यांत अपात्र ठरले होते. या परिस्थितीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

ब्राझीलची २०२३ मधील पॅन अमेरिकन स्पर्धा विजेती ज्युसिलेन रोमेऊ किंवा तुर्कस्तानची एस्रा यिल्दिझ काहरामन यांच्यातील विजेत्या खेळाडूशी लिन हिची उपांत्य लढत होईल. ही लढत गमावली तरीही लिन ब्राँझपदकाची मानकरी ठरेल.

खलिफही उपांत्य फेरीत

लिंग वादाच्या पार्श्वभूमीवर जैविक पुरुष मानण्यात येणाऱ्या अल्जेरियन बॉक्सर इमाने खलिफनेही ऑलिंपिक पदक निश्चित करताना उपांत्य फेरी गाठली. तिच्या लिंग पात्रतेमुळे सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये वाद झाला आहे.

खलिफ महिलांच्या ६६ किलो गटातील उपांत्य फेरी गाठताना हंगेरीच्या ॲना लुका हॅमोरी हिच्यावर एकमताच्या निर्णयाने सोपा विजय नोंदविला. खलिफची मागील प्रतिस्पर्धी अँजेला कारिनी हिच्या तुलनेत हॅमोरी हिने तीन फेऱ्यांपर्यंत तग धरला, परंतु ती शारीरिकदृष्ट्या वरचढ असलेल्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा पाडाव करू शकली नाही. राऊंड ऑफ १६ फेरीत कारिनी हिच्याविरुद्ध लढत ४६ सेकंदांत संपल्यापासून खलिफ वादाच्या भोवऱ्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT