Paris Olympic Opening Ceremony: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला अधिकृतरित्या शुक्रवारी सुरुवात झाली. पॅरिसच्या सीन नदीकाठी हा सोहळा पार पडला. ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच खुल्या आसमंतात उद्घाटन सोहळा पार पडला.
त्यामुळे सर्वांनाच एक आगळा-वेगळा असा उद्घाटन सोहळा पाहायला मिळाला. तसेच बोटीतून संचालनाचा एक वेगळा अनुभव खेळाडूंनीही घेतला. यादरम्यान अनेक कलाकारांचे परफॉर्मन्सही पाहायला मिळाले.
सर्व संघांच्या संचालनानंतर सीन नदीकाळी अखेरीस एक परफॉर्मन्स झाला. त्यानंतर शेवटी ऑलिम्पिकच्या भावनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि शांतता व एकतेचा संदेश देणाऱ्या घोड्याच्या प्रतिकृतीने सीन नदीवरून दौड केली.
नंतर ऑलिम्पिकचा ध्वज फडकावण्यात आला आणि ऑलिम्पिक अँथम झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांची भाषणं झाली. यानंतर आयफेल टॉवरवर लाईट शो दाखवण्यात आला.
शेवटी फ्रान्सचा माजी फुटबॉलपटू झिनेदिन झिदानने ऑलिम्पिक मशाल स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालकडे सोपवली, त्याने ती सेरेना विलियम्सकडे सोपवली. यानंतर सीन नदीतून सेरेनाने माजी फ्रेंच टेनिसपटू एमेलि मुरेस्मोकडे मशालीची जबाबदारी दिली. तिने पुढे टोनी पार्करकडे सोपवली. यासह एक एक खेळाडूने ती मशाल हाती घेतली.
अखेरीस १०० वर्षीय माजी सायकलिस्ट चार्ल्स कोस्टे यांनी मशाल टेडी रिनरकडे सोपवली, ज्याने हॉट बलूनच्या आजूबाजूची आग पेटवली. त्यानंतर सेलिन डिऑनचा परफॉर्मन्स झाला आणि ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा संपला अन् स्पर्धेला अधिकृतरित्या सुरुवात झाली.
भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री १.१५ च्या सुमारास फ्रान्स संघांची बोट सर्वांसमोर आली. यजमान फ्रान्सचे ५०० हून अधिक खेळाडू या स्पर्धेत सरभागी होणार आहेत. फ्रान्स संघाच्या संचलनावेळीही पाऊस येत होता.
भारतीय संघाच्या संचलनानंतर काही कलाकारांचे परफॉर्मन्स झाले. तसेच त्यानंतर पुन्हा खेळाडूंच्या संचलनाला सुरूवात झाली. दरम्यान, पावसाचा जोरही यावेळी वाढलेला दिसून आला. त्यामुळे खेळाडूंनी रेनकोट घातलेले दिसले.
ऑलिम्पिकमध्ये भारताच्या ध्वज वाहकांची यादी:
१९२० - पुर्मा बॅनर्जी
१९३२ - लाल शाह बोखारी
१९३६ - मेजर ध्यानचंद
१९४८ - तालिमेरान एओ
१९५२ - बलबीर सिंग सीनियर
१९५६ - बलबीर सिंग सीनियर
१९६४ - गुरबचन सिंग रंधावा
१९७२ - डी.एन. डिव्हाईन जोन्स
१९८४ - जफर इक्बाल
१९८८ - करतार सिंग
१९९२ - शायनी अब्राहम
१९९६ - प्रगट सिंग
२००० - लिएंडर पेस
२००४ - अंजू बॉबी जॉर्ज
२००८ - राज्यवर्धन सिंह राठोड
२०१२ - सुशील कुमार
२०१६ - अभिनव बिंद्रा
२०२० - मेरी कॉम, मनप्रीत सिंग
२०२४ - शरथ कमल, पीव्ही सिंधू
भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री १२.३० च्या सुमारास भारतीय संघाची संचलनावेळी ओळख करून देण्यात आली. यावेळी पीव्ही सिंधू आणि शरथ कमल भारताचे ध्वजधारक होते. संचलनावेळी भारतीय खेळाडूंमध्ये उत्साह दिसून आला.
पॅरिसमधील नोत्र डॅमच्या रचना कशी झाली हे दाखवणारा दुसरा परफॉर्मन्स झाला. यानंतरही काही परफॉर्मन्स झाले. याच आया नाकामुराच्या परफॉर्मन्सचाही समावेश होता. पुन्हा संघांचे संचलन चालू झाले.
काही देशांचे संचालन झाल्यानंतर प्रसिद्ध लेडी गागा हिचा परफॉर्मन्स झाला. यानंतर पुन्हा खेळाडूंचे संचालन सुरू झाले.
खेळाडूंचे संचलन सुरू झाले असून पहिल्यांचा ग्रीसच्या खेळाडूंचे बोटीतून संचलन झाले. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिका, जर्मनी असे संघ आले. प्रत्येक सहभागी देशांच्या संघांचे संचलन सुरू झाले आहे.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सीन नदीच्या तीरावर सुरू झाला आहे. या उद्घाटन सोहळ्यात जवळपास १० हजार खेळाडू सहभागी होणार आहेत. तसेच खेळाडूंच्या संचालनासाठी १०० बोटी असणार आहेत. सीन नदीवर आठ किमी अंतरावर बोटीतून खेळाडूंचे संचलन होत आहे. हा उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी लाखो प्रेक्षकही उपस्थित आहेत.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही खास संदेश दिलाय.
सचिनने पोस्ट केली की 'ऑलिम्पिक स्पर्धा नेहमीच एकता आणि उत्तमतेचा मोहोत्सव असतो. पॅरिस ऑलिम्पिक सुरू होतंय, तर आपल्या १४० कोटी हृदयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ११७ भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देऊया. जा आणि आम्हाला आभिमान वाटेल अशी कामगीरी करा.'
Paris Olympic 2024 Opening Ceremony: पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ११ वाजता पॅरिसमधील प्रसिद्ध सीन नदीच्या तीरावर या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होईल.
या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारतीय खेळाडूही सज्ज आहेत. शुक्रवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय संघ अगदी पारंपारिक वेशभूषेत दिसणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्यात बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि टेबल टेनिस खेळाडू शरथ कमल भारताचे ध्वजधारक असणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.