Manu Bhaker Paris Olympics 2024 Closing Ceremony : फ्रान्सच्या राजधानीत खेळल्या जाणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने एकाच ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दोन पदके जिंकून नवा इतिहास रचला. नेमबाजी स्पर्धेत सलग दोन पदके जिंकून मनूने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
अशा परिस्थितीत मनू भाकरकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून तिला भारतीय संघाचा ध्वजवाहक बनवण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या शेवटी निरोप समारंभ होईल तेव्हा मनू भारताचा तिरंगा घेऊन जाणाऱ्या संघाचे नेतृत्व करेल.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे. 26 जुलैपासून सुरू झालेल्या 'क्रीडा महाकुंभ'ची 11 ऑगस्टला सांगता होणार आहे. ANI वृत्तसंस्थेनुसार, 'पिस्तूल क्वीन' मनू भाकर ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
ANI नुसार, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) च्या सूत्रांनी सांगितले की स्टार नेमबाज मनू भाकर समारोप समारंभात महिला ध्वजवाहक असेल तर पुरुष ध्वज वाहकाचे नाव अद्याप घोषित केले गेले नाही. 11 ऑगस्ट रोजी समारोप सोहळा होणार आहे. मनू भाकर ही एका ऑलिम्पिक आवृत्तीत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.
पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात भारतीय संघाचे नेतृत्व स्टार शटलर पीव्ही सिंधू आणि टेबल टेनिसपटू अचंत शरथ कमल यांनी केले होते. पण इतिहास रचणाऱ्या मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. तीन दिवसांच्या कालावधीत दोन कांस्यपदके जिंकून मनू भारताच्या महान खेळाडूंच्या छोट्या यादीत सामील झाली आहे.
10 मीटर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर मनूने मिश्र सांघिक पिस्तुल स्पर्धेत सरबज्योत सिंगसह आणखी एक कांस्यपदक जिंकले. त्याचवेळी शनिवारी तिसरे पदक जिंकण्याची दाट शक्यता होती मात्र 25 मीटर पिस्तुलच्या अंतिम फेरीत तिने चौथे स्थानवर राहिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.