pcb on ipl icc bcci Ramiz Raja pakistan cricket baord complaint ftp calender sakal
क्रीडा

IPL च्या प्रगतीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डला लागली मिर्ची

ICC च्या FTP मध्ये IPL चा समावेश करण्याच्या प्रस्तावाने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड का झाला नाराज ?

Kiran Mahanavar

आयसीसीच्या पुढील फ्युचर टूर प्रोग्राम (FTP) कॅलेंडरमध्ये आयपीएलला अडीच महिन्यांची कालावधी देण्याच्या प्रस्ताव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदकडे (ICC) यांच्याकडे दिला आहे. त्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (PCB) उर्वरित बोर्डाशी चर्चा सुरू केल्या आहे. कारण त्याचा विश्वास आहे की आयपीएलमुळे अनेक आंतरराष्ट्रीय मालिकांवर त्याचा परिणाम होईल.(pcb on ipl icc bcci pakistan cricket baord complaint ftp calender)

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पीटीआयशी केलेल्या विशेष संभाषणात सांगितले आहे की, 2024 ते 2031 या कालावधीत एफटीपी सायकलमध्ये आयपीएलसाठी अडीच महिन्यांचा कालावधी असेल. शाह म्हणाले, 'पुढील एफटीपी सायकलपासून, आयपीएलसाठी अडीच महिन्यांची खिडकी असेल जेणेकरून सर्व सर्वोच्च आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू त्यात खेळू शकतील. याबाबत आम्ही इतर बोर्ड आणि आयसीसीशीही बोललो आहोत. पीसीबीचे मत आहे की या प्रकरणावर चर्चा होणे आवश्यक आहे.

पीसीबीच्या एका सूत्राने सांगितले की, आयसीसी बोर्डाची जुलैमध्ये बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार आहे. आयपीएलच्या या मुद्द्यावर चर्चा केली जाईल. पीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, क्रिकेटमध्ये पैसा येत आहे हे चांगले आहे. आयपीएलसाठी दरवर्षी अव्वल क्रिकेटपटूंना पूर्णपणे बुक करण्याच्या बीसीसीआयच्या योजनेचा आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिकेवर विपरीत परिणाम होईल.

पाकिस्तानी खेळाडूंना 2008 पासून भारतात प्रवेश मिळत नाही. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर IPL मध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाही. सलमान बट, शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर, कामरान अकमल आणि सोहेल तन्वीर आयपीएलच्या पहिल्या हंगामात खेळले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT