Ind Vs Aus shardul thakur 
क्रीडा

World Cup 2023 : 'वर्ल्डकपमध्ये शार्दुल ठाकूरऐवजी या खेळाडूला निवडा...' दिग्गज खेळाडूचा टीम इंडियाला सल्ला

Kiran Mahanavar

World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकपचा थरार येत्या 5 ऑक्टोबरपासून रंगणार आहे. आगामी वर्ल्डकपचे यजमानपद भारताकडे असणार आहे. भारत जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे.

वर्ल्डकपपूर्वी अनुभवी फिरकी गोलंदाज पियुष चावलाने टीम इंडियाला प्लेइंग इलेव्हनबाबत एक सल्ला दिला आहे. चावलाचे मत आहे की, भारताने वर्ल्डकप स्पर्धेतील अकरामध्ये वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची निवड करावी.

मोहम्मद शमीने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत शानदार गोलंदाजी केली. मोहालीच्या मैदानावर त्याने 10 षटकात 51 धावा दिल्या आणि 5 बळी घेतले. त्याचवेळी या सामन्यात शार्दुल सर्वात महागडा ठरला. त्याने 10 षटकात 78 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. भारताने ऑस्ट्रेलियाला निर्धारित 50 षटकात 276 धावांवर बाद केले होते. भारताने हे लक्ष्य 48.4 षटकांत सहज गाठले.

वर्ल्डकपपूर्वी शार्दुलच्या खराब गोलंदाजीमुळे त्याच्यावर बरीच टीका होत आहे. शार्दुलचा इकॉनॉमी रेट नेहमीच जास्त असतो आणि भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये ज्या खेळपट्टीवर खेळणार आहे, ती खेळपट्टी थोडी सपाट असेल, असे चावलाने सांगितले. अशा परिस्थितीत शमीसारखा गोलंदाज शार्दुलपेक्षा जास्त घातक ठरू शकतो.

क्रिकइन्फोवरील चर्चेदरम्यान चावला म्हणाला की, शार्दुलच्या फलंदाजीत 20 चेंडूत 30-40 धावा करेल असे नाही. एका चेंडूवर एक धाव घेण्यासाठी तो चांगला खेळाडू आहे. कधी कधी 24 चेंडूत 25 धावाही करू शकतात. आणि जर तुम्ही त्याच्या गोलंदाजीबद्दल बोललो तर त्याने भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. पण त्यांचा इकॉनॉमी रेट नेहमीच जास्त असतो. भारतीय संघाला ज्या परिस्थितीत खेळायचे आहे ते पाहिल्यास बहुतेक विकेट्स थोडे सपाट असणार आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला योग्य गोलंदाजासारखा खेळाडू हवा आहे. जो 135-140 च्या वेगाने गोलंदाजी करू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adar Poonawalla: पुण्याच्या 'बॅटमॅन'ने 1,000 कोटींना विकत घेतले करण जोहरच्या 'धर्मा'चे 50 टक्के शेअर्स

Latest Maharashtra News Updates : मुंबादेवीचे माजी आमदार अतुल शाह फडणवीसांच्या भेटीला

Assembly Elections 2004 : 'या' पक्षाची उमेदवारी नरसिंगरावांनी स्वीकारली आणि फक्त 11 मतांनी ते विजयी झाले'

Diwali 2024 Gift Idea: दिवाळीत मित्र अन् नातेवाईकांना द्या अप्रतिम भेटवस्तू, 500 रुपयांपेक्षा कमी बजेटमधील गिफ्टची यादी वाचा एका क्लिकवर

ऋषी कपूर यांच्या अचानक निधनाने अशी झालेली कपूर कुटुंबाची अवस्था; लेक रिद्धिमा म्हणाली- तोंडावर दाखवत नसले तरी...

SCROLL FOR NEXT