hockey ind vs esp  esakal
क्रीडा

PR Sreejesh ला खेळाडूंचा कुर्निसात! ऐतिहासिक पदकानंतर पाहा टीम इंडियाचं सेलिब्रेशन, जिंकली मनं

India at Paris Olympic 2024 - १८ वर्ष पी आर श्रीजेश भारतीय सघांची अभेद्य ढाल बनून उभा राहिला आणि आज तो निवृत्त होतोय.. हे पदक त्याच्यासाठी आहे, असे कर्णधार हरमनप्रीत सिंग म्हणाला.

Swadesh Ghanekar

Paris Olympic 2024 Hockey India won bronze: भारतीय पुरुष हॉकी संघाने गुरुवारी दिग्गज गोलरशक्षक पी आर श्रीजेश याला ऑलिम्पिक कांस्यपदक भेट दिले. श्रीजेशची ही भारताकडून शेवटची स्पर्धा होती आणि टीम इंडियाने सुवर्णपदकाचे ध्येय ठेवले होते. पण, अटीतटीच्या लढतीत भारत हरला अन् आज कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनला भिडला. कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या दोन गोलच्या जोरावर भारताने हा सामना २-१ असा जिंकून कांस्यपदक नावावर केले. ५२ वर्षांनंतर भारताने ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदकं नावावर केली.

india hockey bronze medal match भारतीय पुरूष हॉकी संघाने १९२८ ते १९५६ अशी सहा सुवर्णपदकं जिंकली होती. १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर १९६४ व १९८० मध्ये भारताने पुन्हा सुवर्ण कामगिरी केली. १९६८, १९७२ व २०२० मध्ये भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. भारतीय संघाने ५२ वर्षांनंतर पुन्हा एकदा सलग दोन कांस्यपदक जिंकण्याचा पराक्रम आज करून दाखवला. या विजयानंतर पी आर श्रीजेशला सर्वांनी कुर्निसात केला. हरमनप्रीतने त्याला खांद्यावर उचलून घेतले.

२००४ मध्ये श्रीजेश पहिल्यांदा ज्युनियर कॅम्पमध्ये आला होता आणि आज तो दोन दशकानंतर भारताचा महान खेळाडू म्हणून निवृत्त होतोय... त्याचं घरातील कपाट असंख्य ट्रॉफी अन् पदकांनी भरलेलं आहे. ऑलिम्पिक कांस्यपदक, आशिया स्पर्धेचं सुवर्ण ( आणि कांस्य), राष्ट्रकुल स्पर्धेचं रौप्य आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची अनेक पदकं त्याच्या नावावर आहेत. आज तो भारतीय संघातील सर्वात वयस्कर खेळाडू आहे.

भारत-स्पेन यांच्यातल्या पहिल्या १५ मिनिटांत दोन्ही संघांनी एकमेकांना टक्कर दिल्यानंतर स्पेनने १८व्या मिनिटाला मार्क मिरालेसला आघाडी मिळवून दिले. त्याला ३०व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून उत्तर दिले. ३३व्या मिनिटाला हरमनप्रीतने आणखी एक गोल करून भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली आणि शेवटच्या सेकंदापर्यंत ती टिकवून बाजी मारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT