PM Modi on Vinesh Phogat 
क्रीडा

PM Modi on Vinesh Phogat: विनेश तू चॅम्पियन आहेस! मला माहीत आहे तू.. पदक गमावल्यावर PM मोदींनी केलं सांत्वन

Pm Modi on Vinesh Phogat Disqualification: तिने ऑलिम्पिकमध्ये केलेली कामगिरी चमकदार होती. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत विनेशचं सांत्वन केलं आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- कुस्तीपटू विनेश फोगट ही ऑलिम्पिक स्पर्धेत अपात्र ठरली आहे. त्यामुळे तिचं गोल्ड मेडल मिळवण्याचं स्वप्न भंगल आहे. त्यामुळे विनेश फोगाटसह संपूर्ण भारतीयांच्या पदरी निराशा पडली आहे. पण, तिने ऑलिम्पिकमध्ये केलेली कामगिरी चमकदार होती. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत विनेशचं सांत्वन केलं आहे.

मोदी म्हणालेत की, विनेश तू चॅम्पियन आहेत. तू देशाचा अभिमान आणि प्रत्येक देशवासियांसाठी प्रेरणादायी आहेस. आजचा सेटबॅक हा दुःखद आहे. माझे शब्द माझ्या मनातील निराशा दाखवू शकणार नाहीत. पण, तू लढवयी आहेस, हार न मानणारी आहेस. आव्हानांचा स्वीकार करण्याचा तुझा स्वभाव आहे. तू पुन्हा अधिक ताकदीने पुढे ये. आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत.

मोदी यांचा पीटी उषा यांच्याशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी IOA अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. पीटी उषा यांच्याकडून या विषयावर आणि विनेशच्या अपात्रतेनंतर भारताकडे कोणते पर्याय आहेत याबद्दल प्राथमिक माहिती घेतली असल्याचं कळतंय.

मोदींनी पीटी उषा यांना विनेशच्या केसमध्ये मदत करण्यासाठी कोणते पर्याय आहेत याची चाचपणी करण्यास सांगितलं आहे. विनेशला मदत होणार असेल तर तिच्या अपात्रतेबद्दल तीव्र निषेध नोंदवावा असेही त्यांनी पीटी उषा यांना सांगितले आहे.

विनेश फोगाट हिला १०० ग्रॅम वजन जास्त झाल्याने ५० किलो वजन गटातून अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण भारतासाठी हा निराशेचा दिवस आहे. विनेश फोगाट गोल्ड मेडल जिंकण्यापासून एक पाऊल दूर होती. पण, अचानक ऑलिम्पिक समितीने तिला अपात्र ठरवलं आहे. हा मोठा धक्का आहे. असे असले तरी विनेशची कामगिरी कौतुकास्पद होती. त्यामुळे देशभरातून तिच्या सांत्वनाच्या प्रतिक्रिया येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT