Ind vs Aus Prasidh Krishna : ऋतुराज शेर, तर मॅक्सवेल सव्वाशेर, असा सामना झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच विकेटने पराभव केला आणि तिसरा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम ठेवले. सामना निकाल शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूवर लागला.
कर्णधार सूर्यकुमार यादवने शेवटचे षटक वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला दिले, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 21 धावांची गरज होती. पण ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला शेवटच्या षटकात कोणतीही अडचण आली नाही, त्याने आरामात षटकार चौकार मारत ऑस्ट्रेलियाला सामना जिंकून दिला. पण यादरम्यान खराब गोलंदाजीमुळे प्रसिद्ध कृष्णाच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात प्रसिद्ध कृष्णा लयीत दिसला नाही. त्यांच्याविरुद्ध ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी मोठे फटके मारले आणि भरपूर धावा केल्या. त्याने 4 षटकांत 68 धावा दिल्या आणि एकही विकेट घेता आला नाही. टी-20 सामन्यात सर्वाधिक धावा देणार तो भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने युझवेंद्र चहलचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. चहलने 2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात 64 धावा दिल्या होत्या.
भारतासाठी टी-20 मध्ये सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज :
प्रसिद्ध कृष्णा- 68 धावा
युझवेंद्र चहल- 64 धावा
अर्शदीप सिंग- 62 धावा
जोगिंदर शर्मा- 57 धावा
दीपक चहर- 56 धावा
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली प्रसिद्ध कृष्णाने यावर्षी आयर्लंडविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने भारतासाठी 17 एकदिवसीय सामन्यात 29 आणि 5 टी-20 सामन्यात 8 विकेट घेतले आहेत. हार्दिक पंड्याच्या दुखापतीनंतर त्याला एकदिवसीय वर्ल्ड कप संघात स्थान मिळाले होते, परंतु एका सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.