Prasidh Krishna : भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्याच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दुखापतग्रस्त झाला आहे. 27 वर्षाच्या प्रसिद्ध कृष्णाने नुकतेच दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्वस केलं होत. कर्नाटक - गुजरात सामन्यादरम्यान त्याच्या मांडीचा स्नायू दुखवला. त्यामुळे त्याला इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी मुकावे लागले आहे.
प्रसिद्ध कृष्णाला वगळण्याचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रसिद्धच्या दुखापतीची वेळ अधिक वाईट असू शकत नाही. दुखापतीमुळे मोहम्मद शमी आधीच संघाबाहेर गेल्यामुळे भारताच्या वेगवान माऱ्याची धार कमी झाली आहे. कृष्णाच्या अनुपस्थितीमुळे लाइनअप आणखी कमकुवत होईल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आणि आवेश खान यांच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी आली आहे.
प्रसिद्ध कृष्णाची दक्षिण आफ्रिका मालिकेतील त्याची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती. जिथे त्याने दोन कसोटीत फक्त दोन विकेट्स मिळवल्या होत्या. कृष्णाला इंग्लंडविरुद्ध संभाव्य ट्रम्प कार्ड म्हणून पाहिले जात होते. त्याची उंची आणि तीव्र उसळी निर्माण करण्याची क्षमता भारतीय खेळपट्ट्यांवर विशेषतः प्रभावी ठरू शकते. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीमुळे भारताच्या गोलंदाजी योजनांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.