hockey ind vs esp esakal
क्रीडा

India Hockey : कांस्यपदक विजेत्या हॉकी संघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन, म्हणाले...

Swadesh Ghanekar

Paris Olympic 2024 Hockey India won bronze: भारतीय पुरुष हॉकी संघाने गुरुवारी दिग्गज गोलरशक्षक पी आर श्रीजेश याला ऑलिम्पिक कांस्यपदक भेट दिले. भारताने कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या दोन गोलच्या जोरावर स्पेनविरुद्धचा सामना २-१ असा जिंकून कांस्यपदक नावावर केले. ५२ वर्षांनंतर भारताने ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदकं नावावर केली. भारतीय पुरुष हॉकी संघाच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ( PM Narendra Modi Called) खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी कॉल केला.

भारत-स्पेन यांच्यातल्या लढतीत पहिल्या १५ मिनिटांत दोन्ही संघांनी एकमेकांना टक्कर दिल्यानंतर स्पेनने १८व्या मिनिटाला मार्क मिरालेसच्या गोलच्या जोरावर आघाडी मिळवली. त्याला ३०व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून उत्तर दिले. ३३व्या मिनिटाला हरमनप्रीतने आणखी एक गोल करून भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली आणि ती टिकवून बाजी मारली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की,''हा पराक्रम पुढच्या पिढ्यांसाठी जपला जाईल असा आहे. भारतीय हॉकी संघानं ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले! ऑलिम्पिकमधील त्यांचे हे सलग दुसरे पदक आहे. त्यांचे यश कौशल्य, चिकाटी आणि सांघिक भावनेचा हा विजय आहे. खेळाडूंचे अभिनंदन.''

'' प्रत्येक भारतीयाचा हॉकीशी भावनिक संबंध आहे आणि ही कामगिरी आपल्या देशातील तरुणांमध्ये हा खेळ अधिक लोकप्रिय करेल,''असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.

भारतीय पुरूष हॉकी संघाने १९२८ ते १९५६ अशी सहा सुवर्णपदकं जिंकली होती. १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर १९६४ व १९८० मध्ये भारताने पुन्हा सुवर्ण कामगिरी केली. १९६८, १९७२ व २०२० मध्ये भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. भारतीय संघाने ५२ वर्षांनंतर पुन्हा एकदा सलग दोन कांस्यपदक जिंकण्याचा पराक्रम आज करून दाखवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील शाळांचे व्यवस्थापन गुजरातच्या अदानी फाउंडेशनकडे हस्तांतरित; शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

Mumbai Accident: कल्याण-पत्री पुलावर 106 चाकांचा ट्रेलर उलटला; डोंबिवलीहून कल्याणला जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी

Jitendra Awhad: अक्षय शिंदेची जी हत्या झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका...; आव्हाडांकडून ऑडिओ क्लिप ट्विट

Chandrapur : विद्यार्थ्यांना मारहाण; शिक्षिकेवर गुन्हा...व्याहाड शाळेतील शिक्षिकेच्या पाणी बाँटलमध्ये दारू टाकल्याचा संशय

Latest Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आज पुण्यात तर शरद पवार गटाचे समरजीत घाडगे मुंबईत घेणार मेळावे

SCROLL FOR NEXT