Prithvi Shaw comeback boost Mumbai batting ranji trophy cricket Sakal
क्रीडा

Ranji Trophy : पृथ्वी शॉच्या पुनरागमनामुळे मुंबईच्या फलंदाजीला बळ

सलग तीन विजय, त्यानंतर घरच्या मैदानावर उत्तर प्रदेशविरुद्ध हार स्वीकारावी लागलेल्या मुंबई संघाची फलंदाजी यंदाच्या रणजी स्पर्धेत अपेक्षा पूर्ण करू शकलेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

कोलकाता : सलग तीन विजय, त्यानंतर घरच्या मैदानावर उत्तर प्रदेशविरुद्ध हार स्वीकारावी लागलेल्या मुंबई संघाची फलंदाजी यंदाच्या रणजी स्पर्धेत अपेक्षा पूर्ण करू शकलेली नाही. उद्यापासून सुरू होणाऱ्या कोलकाताविरुद्धच्या सामन्यात पृथ्वी शॉचे पुनरागमन होत असल्यामुळे मुंबईची ताकद वाढली आहे.

मुंबई संघाने भले पहिले तीन सामने जिंकले; परंतु जय बिस्ता आणि भूपेन लालवानी यांनी अधूनमधून दिलेले योगदान हा अपवाद वगळता कर्णधार अजिंक्य रहाणेनेही निराशा केली आहे. तळाच्या फलंदाजांनी केलेल्या शानदार फलंदाजीमुळे मुंबईला पहिल्या दोन सामन्यांत बोनस गुणांसह विजय मिळवता आला होता.

वानखेडे स्टेडियममध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या सामन्यात रहाणेचे अपयश कायम राहिले. दारूण पराभवाचा सामना करावा लागण्याची स्थिती निर्माण झालेली असताना शिवम दुबेने दुसऱ्या डावात घणाघाती शतक केले होते, त्यानंतर गोलंदाजांनी प्रयत्न केले तरी निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला होता.

आता पृथ्वी शॉ तंदुरुस्त झाल्यामुळे मुंबईला दिलासा मिळाला आहे. इंग्लिश कौंटी स्पर्धेत खेळत असताना ऑगस्ट महिन्यात पृथ्वी शॉच्या गुडघ्याच्या स्नायूला दुखापत झाली होती. लंडनमध्येच त्यावर शस्त्रक्रिया झाली,

त्यांतर पुनर्वसनासाठी तो बंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत होता. आता या अकादमीतून तो खेळण्यास तयार असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याची निवड मुंबई संघात करण्यात आली.

उत्तर प्रदेशविरुद्धचा सामना गमावला असला तरी मुंबईचा संघ ‘ब’ गटात २० गुणांसह आघाडीवर आहे; तर बंगाल १२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. बंगालला चारपैकी एका सामन्यात विजय मिळवता आलेला आहे, तर उर्वरित तीन सामने अनिर्णित राहिले आहेत.

महाराष्ट्र-सौराष्ट्र लढत

सोलापूर : ‘अ’ गटातील लढतीत उद्या महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यातील लढत होत आहे. दोन्ही संघ अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर असल्यामुळे त्यांना पुढच्या प्रगतीसाठी विजय किंवा पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण आवश्यक आहेत.

दोघांनाही प्रत्येकी चार सामन्यांतील एका लढतीत विजय, तर एका लढतीत पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. सौराष्ट्रकडून चेतेश्वर पुजारा फॉर्मात आला आहे. त्याची कामगिरी सौराष्ट्रसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT