Prithvi Shaw Case : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू पृथ्वी शॉवरील हल्ला प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया इंफ्लूएंसर सपना गिलसह तिघांवर पृथ्वी शॉ वर हल्लाप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर या सर्वांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
मात्र, आता सपना गिलसह अन्य तीन आरोपींनी जामीन मंजूर करण्यात आला आहे. पृथ्वी शॉ कडून या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यानंतर पोलिसांनी सपना गिलसह अन्य आरोपींना अटक केली होती.
नेमकं प्रकरण काय?
14 फेब्रुवारी रोजी मुंबईतील सांताक्रूझ भागातील एका हॉटेलबाहेर पृथ्वी शॉवर कथितपणे मारहाण करण्यात आली होती. तसेच त्याच्या कारवर बेसबॉल बॅटने हल्ला करण्यात आला.
सोशल मीडिया इंफ्लूएंसर सपना गिलसह अन्य व्यक्तींसोबत सेल्फी घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर हा वाद इतका विकोपाल गेला की, सपना गिल आणि अन्य तिघांनी पृथ्वी शॉसोबत हातापायी झाली.
कोण आहे सपना गिल?
सपना गिल ही सोशल मीडिया इंफ्लूएंसर असून, तिचे इंस्टाग्रामवर 218,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सपना गिलने 2021 मध्ये भोजपुरी चित्रपट मेरा वतन आणि 2017 मध्ये काशी अमरनाथमध्येही काम केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.