Indian Cricket Team Tour Of South Africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतग्रस्त झाला असून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून त्याने माघार घेतली आहे. बीसीसीआयने (BCCI) अधिकृतरित्या यासंदर्भात माहिती दिलीये. एवढेच नाहीत तर रोहित शर्माच्या जागी प्रियांक पांचाल याला संघात स्थान देण्यात आले आहे. रोहित शर्माची दुखापत गंभीर असून यातून सावरण्यासाठी त्याला काही वेळ लागणार असल्यामुळे संघात बदल करण्याची वेळ आली आहे. दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध भारतीय अ संघाचे नेतृत्व करणाऱ्या प्रियांक पांचालला त्याच्या जागी संधी देण्यात आली आहे.
कोण आहे प्रियांक पांचाल
गुजरातमधील अहमदाबादमध्ये जन्मलेल्या प्रियांक पांचाल देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातकडून खेळतो. 31 वर्षीय प्रियांक पांचाल नुकताच दक्षिण आफ्रिका दौराही केलाय. त्याने भारतीय अ संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. प्रियांक पांचाल 15 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. मुलाने क्रिकेट व्हावे आणि देशासाठी खेळावे, अशी त्यांची इच्छा होती. वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी त्याच्याकडे आता चालून आलीये.
प्रियांक पांचालची कारकिर्द
वरिष्ठ संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय अ संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. यावेळी निवड समितीने पृथ्वी शॉच्या जागी गुजरातच्या फलंदाज प्रियांक पांचाल याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली होती. प्रियांक हा अनुभवी फलंदाज आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 98 सामन्यात त्याने 45.63 च्या सरासरीने 6891 धावा केल्या आहेत. यात 24 शतकांचा समावेश आहे. याशिवाय लिस्ट एमध्ये देखील त्याने 40.19 च्या सरासरीने 2854 धावा केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.