क्रीडा

प्रो-कबड्डीसाठी चंदगडच्या सिद्धार्थला 1 कोटी 30 लाखांची 'बोली'

अशोक पाटील

कोटीच्यावर लिलाव झालेल्या दोन खेळाडूमध्ये सिध्दार्थचा समावेश झाल्याने क्रीडा प्रेमीतून आनंद व्यक्त होत आहे.

कोवाड : डिसेंबर महिन्यात होणाऱ्या आठव्या हंगामातील प्रो कबड्डी लीग स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचा प्रो-कबड्डीचा स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाईला तेलुगू टायटन्स संघाने 1 कोटी 30 लाखाच्या किंमतीला संघात स्थान पक्के केल्याने चंदगड तालुक्यातील क्रीडा प्रेमीतून आनंद व्यक्त होत आहे.

हुंदळेवाडी (ता. चंदगड) येथील सूरज देसाई व सिध्दार्थ देसाई या सख्या भावानी प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात तेलुगू टायटन्स संघातून खेळताना ठसा उटविला होता. आठव्या हंगामात सिध्दार्थची निवड झाली असल्याने सुरजच्या निवडीकडे क्रीडा प्रेमींचे डोळे लागले आहेत. प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात 1.45 कोटी रुपयांसह सर्वात महागड्या ठरलेल्या सिध्दार्थ देसाईला आठव्या हंगामात तेलुगू टायटन्सने पुन्हा संघात स्थान देऊन विश्वास दर्शविला आहे. तीन दिवस चाललेल्या लिलावात 450 हून अधिक कबड्डीपट्टू सहभागी झाले होते. कोटीच्यावर लिलाव झालेल्या दोन खेळाडूमध्ये सिध्दार्थचा समावेश झाल्याने क्रीडा प्रेमीतून आनंद व्यक्त होत आहे.

सिध्दार्थला घेण्यासाठी अनेक संघानी प्रयत्न केले होते. यूपी योध्दाने 1.30 कोटी रुपयांची बोली उंचावली होती. सिध्दार्थ आपल्या हातून सुटणार असे लक्षात येताच तेलुगू टायटन्सने आपल्या विशेष कार्डाचा वापर करुन सिध्दार्थला आपल्याकडे खेचले. सिध्दार्थ देसाईने आपल्या आक्रमक चाढाईने प्रो कबड्डीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. खेळातील सातत्य व गुणांचा वर्षाव करणाऱ्या देसाईला लिलावाच्यावेळी घेण्यासाठी सर्वच संघातून वरचढ होती. हुंदळेवाडी गावात शालेय स्तरापासून कबड्डीचे बाळकडू घेतलेल्या सुरज व सिध्दार्थने राष्ट्रीय पातळीवर आपल्या खेळाची छाप पाडली आहे.

सुरज सैन्य दलात नोकरी करतो तर सिध्दार्थ रेल्वेमध्ये आहे. प्रो कबड्डीत खेळण्याचे या देसाई बंधुंचे स्वप्न होते. 2014 साली अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या जयपूर पिंक पॅंथर्सने सुरजाला बोली लावली होती. मात्र सैन्य दलाने परवानगी नाकारल्याने सुरजाला या स्पर्धेसाठी मुकावे लागले. पाचव्या हंगामात दबंग दिल्ली संघाने सुरजला संघात घेतले. पण सरावाच्यावेळी पायाला दुखापत झाल्याने या स्पर्धेलाही त्याला मुकावे लागले.

निराश झालेल्या सुरजने सिध्दार्थला प्रो कबड्डीचे मार्गदर्शन केल्याने सहाव्या हंगामात सिध्दार्थची यू-मुम्बा संघात निवड झाली. आपल्या आक्रमक चढाईने सिध्दार्थने सर्वांचे लक्ष वेधले. 218 गुण मिळवून स्पर्धेत त्याने आघाडी घेतली. सातव्या हंगामात 1.45 कोटीला तेलुगू टायटन्सने सिध्दार्थला संघात स्थान दिले. तेलुगू टायटन्सचा विश्वास सार्थ ठरवताना सिध्दार्थने 217 गुणांची कमाई केली. त्यामुळे आठव्या हंगामात पुन्हा तेलुगू टायटन्स संघाने विशेष कार्डचा वापर करुन सिध्दार्थला कायम केल्याने क्रीडा क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.

हंगाम संघ बोली गुण

  • सहावा यु-मुम्बा, 36 लाख 218.

  • सातवा तेलुगू टायटन्स, 1.45 कोटी 217.

  • आठवा तेलुगू टायटन्स, 1.30 कोटी --

प्रो कबड्डीतील बाहुबली फेम सिध्दार्थ देसाईचा कोटीच्या घरात लिलाव झाल्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राची मान उंचावली आहे. सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. सिध्दार्थची निवड झाली असल्याने त्याचा मोठा भाऊ सुरजच्या निवडीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT