Pro Kabaddi Final Match 2024 sakal
क्रीडा

Pro Kabaddi Final Match 2024 : प्रो कबड्डीत पुणे प्रथमच चॅम्पियन ; अंतिम सामन्यात हरियानावर मात

मदार होती अस्लम इनामदारवर, पण हुकमाचा पत्ता ठरला तो पंकज मोहिते. एकाच चढाईत चार गुण मिळवून कलाटणी देणाऱ्या पंकजच्या शानदार खेळाच्या जोरावर पुणेरी पलटणने हरियानाचा २८-२५ असा पराभव केला आणि प्रो कबड्डीत पहिलेवहिले अजिंक्यपद मिळवले.

सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद : मदार होती अस्लम इनामदारवर, पण हुकमाचा पत्ता ठरला तो पंकज मोहिते. एकाच चढाईत चार गुण मिळवून कलाटणी देणाऱ्या पंकजच्या शानदार खेळाच्या जोरावर पुणेरी पलटणने हरियानाचा २८-२५ असा पराभव केला आणि प्रो कबड्डीत पहिलेवहिले अजिंक्यपद मिळवले. गतवर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या पुण्याच्या संघाने या वेळी थाटात विजेतेपदाला गवसणी घातली. साखळी स्पर्धेत २२ पैकी १७ विजय मिळवणारा पुण्याचा संघ अव्वल होता आणि अव्वलच राहिला.

मध्यांतराच्या काही क्षण अटीतटीचा सामना असताना पंकजने एकाच चढाईत चार गुण मिळवले, त्यानंतर प्रत्येक वेळी निर्णायक चढाईतही गुण मिळवत त्याने आपल्या संघाला आघाडीवर ठेवले.पंकजने एकूण १० गुण मिळवले. मोहित गोयतने पाच तर संघाला पकड मिळाल्यानंतर वर्चस्व ठेवणाऱ्या अस्लमने चार गुणांची कमाई केली. कोपरारक्षक गौरव खत्री आणि मोह्ममद्रेझा यांचाही खेळ मोलाचा ठरला.

हरियानाकडून खेळणारा शिवम पाठारे बोनस गुण मिळवत होता; परंतु गौरव खत्रीने त्याची एका चढाईत केलेली पकड हरियाना खेळाडूंचा आत्मविश्वास कमजोर करणारा ठरला.पहिल्या दोन चढायांत एकही गुण मिळवण्यात आला नाही त्यावरून हा सामना सावधपणे खेळला जाणार हे उघड झाले होते. हरियानाच्या शिवम पाठारेची पकड करून पुण्याने पहिला गुण मिळवला. त्यानंतर मोहितने डू ऑर डाय चढाई असूनही गुण मिळवला आणि २-० अशी आघाडी पुण्याला मिळवून दिली. मोहितने हीच करामत पुन्हा डू ऑर डाय चढाईत केली. पुणे ३-० असे आघाडीवर असताना सहाव्या मिनिटाला हरियानाने पहिला गुण मिळवला.

शिवम पाठारेने आपल्या चढाईत अस्लमला बाद केले. त्यानंतर काही काळ पुण्याला गुण मिळवता आला नाही. अस्लम काही मिनिटे कोर्टवर नव्हता. याचा फायदा हरियानाने घेतला आणि ५-५ बरोबरी साधली. यावेळी अस्लमला जीवदान मिळाले, तो कोर्टवर आला; पण पुढच्या चढाईत तो लगेचच बाद झाला.

असे घडले नाट्य

पहिले अर्ध संपायला दीड मिनीट शिल्लक असताना मोठे नाट्य घडले. पुण्याकडे ९-७ अशी आघाडी होती; पण पंकज चढाईला आला ती चढाई डू ऑर डॉयची होती. त्याने या चढाईत चार गुणांची सुपर चढाई केली आणि लगेचच गुणफलक १३-९ असा झाला. पुण्याचा आवश्यक असलेली पकड मिळाली खरी; पण त्यांना ती कायम राखता आली नाही. हरियानाकडे विशाल ताटे हा एकच खेळाडू होता. त्याला बाद करून लोण देण्याची संधी पुण्याला होती; परंतु त्याने बोनस गुण मिळवत आणि एक गुणही मिळवला. मध्यांतरला गुणफलक १३-१० असा झाला.

हरियानावर बोनस देण्याची हुकलेली संधी पुण्याने उत्तरार्धात चौथ्या मिनिटाला साधली. त्यानंतर पंकजने निर्णायक चढाईत गुण मिळवला आणि संघाला २०-१३ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुण्याने मागे वळून पाहिले नाही. सामना संपायला काही वेळ असताना हरियानाने सिद्धार्थ देसाईला मैदानावर उतरवले, त्यानंतर झटापटीत गुण मिळवले; परंतु सामन्याचा निकाल तो बदलू शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT