punjab kings-new-captain-shikhar dhawan-will-lead-the-team-to-the-playoffs ipl 2023 cricket news in marathi kgm00  
क्रीडा

IPL 2023: नवा कर्णधार... नवा कोच... बदलणार का पंजाब किंग्जचे नशीब

पंजाब किंग्ज 2014 पासून प्लेऑफमध्ये पोहोचलेले नाहीत आता तरी...

सकाळ ऑनलाईन टीम

Punjab Kings New Captain Shikhar Dhawan : आयपीएल 2023चा पहिला सामना अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावेळी हंगाम सुरू होण्यापूर्वीच जखमी खेळाडूंनी प्रत्येक संघाच्या अडचणी वाढवल्या आहेत. यामध्ये पंजाब किंग्जचाही समावेश आहे. लीग सुरू होण्यापूर्वीच किंग्जला मोठा धक्का बसला आहे. धडाकेबाज फलंदाज जॉनी बेअरस्टोच्या पायाची दुखापत बरा झालेला नाही. त्यामुळे तो आयपीएलच्या 16व्या हंगामात खेळणार नाही. संघाने त्याच्या जागी मॅथ्यू शॉर्टचा समावेश केला आहे.

त्याचवेळी किंग्जचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाही पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळणार नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर तो तीन एप्रिलला संघात सामील होणार आहे.

पंजाब किंग्ज 2014 पासून प्लेऑफमध्ये पोहोचलेले नाहीत. आयपीएल 2022 मध्ये संघ सहाव्या स्थानावर होता. यावेळी संघ नवीन कर्णधार आणि प्रशिक्षकासह लीगमध्ये उतरणार आहे. अशा स्थितीत प्रशिक्षक-कर्णधाराची नवी जुगलबंदी संघाच्या विचारात बदल घडवून आणणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिखर धवन आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व करणार आहे. शिखर हा आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्जचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने 14 डावात 460 धावा केल्या होत्या. यावेळी संघाचा कोचिंग स्टाफही पूर्णपणे नवीन आहे. अनिल कुंबळेच्या जागी ट्रेव्हर बेलिसला संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. वसीम जाफरकडे पुन्हा फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुनील जोशी हे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक आहेत.

आयपीएल 2023च्या मिनी लिलावात पंजाब किंग्स दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी पर्स (32.2 कोटी) घेऊन लिलावात उतरला होता. संघाने सॅम कॅरेनला विकत घेण्यासाठी अर्धा खर्च केला आणि तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला.

पंजाब किंग्जचे वेगवान आक्रमण चांगले आहे. संघात वेगवान गोलंदाज तसेच टी-20 विशेषज्ञ गोलंदाज आहेत. रबाडा, अर्शदीप सिंग आणि कॅम केरन संघाच्या वेगवान गोलंदाजांना बळ देतात. त्याचबरोबर ऋषी धवन हा अष्टपैलू खेळाडू म्हणून गोलंदाजीतही एक पर्याय आहे.

जॉनी बेअरस्टो आयपीएल 2023 मध्ये खेळू शकणार नाही. पण किंग्सकडे चांगले पॉवर हिटर फलंदाज आहेत. बिग बॅश लीगमध्ये या हंगामात सर्वाधिक धावांबाबत बेअरस्टोच्या जागी आलेला मॅथ्यू शॉर्ट दुसऱ्या स्थानावर होता. लियाम लिव्हिंगस्टोन आणि श्रीलंकेच्या भानुका राजपक्षे यांनीही गेल्या मोसमात चांगली कामगिरी केली होती.

सिकंदर रझा संघात सामील झाल्यामुळे पंजाब किंग्जच्या पॉवर हिटिंगला अधिक जीवदान मिळाले आहे. टी-20 मध्ये लिव्हिंगस्टोनचा स्ट्राइक रेट 146, राजपक्षेचा 136 आणि जितेश शर्माचा स्ट्राइक रेट 148 आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या या मोसमात लाहोर कलंदरला चॅम्पियन बनवण्यात रझाने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT