PV Sindhu Comeback Esakal
क्रीडा

PV Sindhu Comeback : तब्बल चार महिन्यानंतर पीव्ही सिंधूचे धडाक्यात पुनरागमन; चीनला दिला पराभवाचा धक्का

PV Sindhu Comeback Asian Championship :भारताने पिछाडी भरून काढत चीनला चारली पराभवाची धूळ

अनिरुद्ध संकपाळ

PV Sindhu Comeback : भारतीय महिला बॅडमिंटन संघाने एशियन चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरी केली. आपल्या पहिल्याच सामन्यात भारतीय महिला संघाने चीनला 3 - 2 असा पराभवाचा धक्का दिला. दोनवेळा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पीव्ही सिंधूने चार महिन्यानंतर दमदार पुनरागमन करत भारताला सहा वर्षानंतर बाद फेरीत पोहचवण्यात महत्वाची भुमिका बजावली.

पीव्ही सिंधूला झाली होती दुखापत

पीव्ही सिंधू ही दुखापतीमुळे गेले चार महिने बॅडमिंटन कोर्टपासून दूर होती. एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेद्वारे तिने आंतरराष्ट्रीय स्तारावर जोरदार पुनरागमन केलं. तिला गुडघ्याची दुखापत झाली होती. पीव्ही सिंधूने तिच्यापेक्षा चांगली रँकिंग असलेल्या हेन युईचा 40 मिनिटांमध्ये 21 - 17, 21 - 15 असा पराभव केला. यामुळे भारताला 1 - 0 अशी आघाडी मिळाली होती. सिंधूची सध्याची रँकिंग ही 11 असून हेन युई ही आठव्या स्थानावर आहे.

सिंधूने विजय मिळवल्यानंतर भारतीय महिला दुरेही जोडी तनिषा क्रोस्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना ल्यू शेंग शू आणि टेन निंग या जोडीने पराभव केला. भारतीय महिला दुहेरी जोडीचा 19-21, 21-16 असा पराभव झाला. दुसऱ्या एकेरी सामन्यात अस्मिता चालिहाला देखील चीनच्या वँग झी यी विरूद्ध पराभव सहन करावा लागला. तिचा 21-13, 21-15 असा पराभव झाला. भारत आता 2 - 1 असा पराभव केला.

जॉली - गायत्रीने बरोबरी साधली

भारत 2 - 1 असा पिछाडीवर पडला होता. मात्र दुसऱ्या महिला दुहेरी सामन्यात त्रीशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने केले. त्यांनी ली यी जिंग आणि लुओ शू मिन या जोडीचा एक तास आणि 9 मिनिटे रंगलेल्या सामन्यात 10-21, 21-18, 21-17 असा पराभव केला. भारताने 2 - 2 अशी बरोबरी केली.

त्यानंतर शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी रँकिंगमध्ये 472 व्या स्थानावर असणाऱ्या अनमोल खरबवर होती. तिने जागतिक क्रमवारीत 149 व्या रँकिंगवर असणाऱ्या चीनच्या वू लियो यूचा 1 तास 17 मिनिटे चालल्या सामन्यात 22-20, 14-21, 21-18, असा पराभव केला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

SCROLL FOR NEXT