PV Sindhu Sakal
क्रीडा

Badminton Competition : पी.व्ही. सिंधूने संधी गमावली; ११-३ आघाडीनंतर अंतिम सामन्यात पराभव

कोणत्याही स्पर्धेच्या विजेतेपदासाठी पी.व्ही. सिंधूची प्रतीक्षा अजून लांबली आहे. मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले.

पीटीआय

क्लॉलालंपूर - कोणत्याही स्पर्धेच्या विजेतेपदासाठी पी.व्ही. सिंधूची प्रतीक्षा अजून लांबली आहे. मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या चीनच्या वँग झी येई हिने सिंधूचा तीन गेमध्ये पराभव केला. निर्णायक सेटमध्ये ११-३ अशा आघाडीनंतर सिंधूने सामना गमावला.

सिंधूला या स्पर्धेत पाचवे मानांकन होते. दोन ऑलिंपिक पदकांचा अनुभवही तिच्या पाठीशी होता; परंतु पुन्हा एकदा निर्णायक सामन्यात बाजी मारण्यास ती अपयशी ठरली. २०२२ मध्ये सिंगापूर आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधूने विजेतेपद मिळवलेले आहे. त्यानंतर विजेतेपदांचा दुष्काळ कायम राहिला आहे. २०२३ मध्ये माद्रिद स्पेन मास्टर्समध्येही तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

या मलेशिया मास्टर्स स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपासून विजयासाठी तीन गेममध्ये खेळावे लागणाऱ्या सिंधूची अंतिम फेरीतही तीन गेममध्ये परीक्षा झाली. निर्णायक गेममध्ये ११-३ अशी भलीमोठी आघाडी घेतलेली असताना सिंधूला पराभवाचे तोंड पाहावे लागले. अखेर ७९ मिनिटांच्या कडव्या झुंजीनंतर सिंधूने हा सामना २१-१६, ५-२१, १६-२१ असा गमावला.

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धा तोंडावर आलेली असताना सिंधूसाठी ही स्पर्धा मोलाची होती. मुळात गुडघा दुखापतीमुळे मोठ्या ब्रेकनंतर ती खेळत आहे. अंतिम फेरीपर्यंत मारलेली मजल ही तिच्यासाठी प्रगतीचा मार्ग तयार करणारी ठरली असती तरी विजेतेपदामुळे आत्मविश्वास कमालीचा वाढला असता. शिवाय ११-३ अशा आघाडीनंतर प्रतिस्पर्धीला विजय बहाल केल्यामुळे हिरमोड झाला.

वँग ही विद्यमान आशियाई विजेती आहे. तिच्या विरुद्धच्या या अंतिम सामन्यात आक्रमक आणि संयमी असा मिश्र खेळ केला. सर्व काही तिच्या बाजूने घडत होते, अपवाद मात्र अंतिम गेमचा आणि तोही मोठ्या आघाडीनंतरचा ठरला. या पराभवामुळे तिच्या हातून चार लाख २० हजार डॉलरचेही बक्षीस निसटले.

या मलेशिया मास्टर्स स्पर्धेत गेल्या दोन्ही वर्षी सिंधू वँगकडून पराभूत झालेली आहे, मात्र गेल्या तीनपैकी दोन लढतीत तिने वँगला हरवलेले आहे. त्यामुळे वँगचा किल्ला भेदणे सिंधूसाठी कठीण नव्हतेच. विशेष म्हणजे, सिंगापूर ओपनमध्ये सिंधूने वँगलाच हरवून विजेतेपद मिळवले होते.

अंतिम गेममध्ये सिंधू ११-३ असे आघाडीवर असताना तिचे विजेतेपद जवळपास निश्चित वाटत होते; परंतु या स्थितीत कोर्टमधील जागांची अदलाबदल झाली आणि सामन्याचा निकालही तेथून बदलू लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT